सोहराबुद्दीन चकमक प्रकरण : आरोपींच्या सुटकेला आव्हान द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2019 06:04 AM2019-01-16T06:04:58+5:302019-01-16T06:04:59+5:30

रुबाबुद्दीनचे गृहमंत्रालय व सीबीआयला पत्र

Sohrabuddin encounter: Challenge the acquittal of the accused | सोहराबुद्दीन चकमक प्रकरण : आरोपींच्या सुटकेला आव्हान द्या

सोहराबुद्दीन चकमक प्रकरण : आरोपींच्या सुटकेला आव्हान द्या

Next

मुंबई: सोहराबुद्दीन शेख कथित बनावट चकमक प्रकरणी आरोपींची सुटका करण्याच्या विशेष न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान द्या, अशी विनंती करणारे पत्र सोहराबुद्दीनचा भाऊ रुबाबुद्दीन शेख याने गृहमंत्रालय आणि सीबीआयला लिहिले आहे.
२१ डिसेंबर, २०१८ रोजी विशेष सीबीआय न्यायालयाने २२ आरोपींची सबळ पुराव्याअभावी सुटका केली. आरोपींवर ठेवण्यात आलेले आरोप सिद्ध करण्यास सीबीआय अपयशी ठरल्याचे निरीक्षण विशेष सीबीआय न्यायालयाने या सर्वांची सुटका करताना निर्णयात नोंदविले आहे.


रुबाबुद्दीनने १४ जानेवारीला गृहमंत्रालय आणि सीबीआयला पत्र लिहीत विशेष न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्याची विनंती त्याने केली आहे.
‘२१ डिसेंबर २०१८ चा विशेष सीबीआय न्यायालयाचा निर्णय सकृतदर्शनी अयोग्य व अव्यवहार्य आहे. सादर केलेले साक्षी-पुरावे विशेष न्यायालयाने नीट ग्राह्य धरले नाहीत. या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान द्यावे, अशी विनंती मी आपणास करतो,’ असे रुबाबुद्दीनने पत्रात म्हटले आहे.


सीबीआयच्या म्हणण्यानुसार, सोहराबुद्दीन, त्याची पत्नी कौसर बी आणि तुलसीराम प्रजापती हैद्राबादहून सांगलीला येत असताना गुजरात व राजस्थान पोलिसांनी यांना २२-२३ नोव्हेंबर, २००५ रोजी ताब्यात घेतले. पोलिसांनी शेख व त्याच्या पत्नीला एका वाहनातून नेले आणि प्रजापतीला दुसऱ्या वाहनातून नेले.
शेखची २६ नोव्हेंबर, २००५ रोजी बनावट चकमक दाखवून पोलिसांनी हत्या केली, तर प्रजापतीची २७ डिसेंबर, २००६ रोजी हत्या केल्याचा आरोप सीबीआयने केला होता.
या प्रकरणी सीबीआयने सुरुवातीला ३८ जणांवर गुन्हा नोंदविला. त्यात भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा व गुजरात व राजस्थानच्या वरिष्ठ आयपीएस अधिकाºयांचा समावेश होता. मात्र, डिसेंबर २०१४ मध्ये विशेष सीबीआय न्यायालयाने शहा व या अधिकाºयांची सबळ पुराव्यांअभावी आरोपमुक्तता केली आणि आता डिसेंबर, २०१८ मध्ये सर्व आरोपींची सुटका केली.


यांच्यावर नोंदविला होता गुन्हा
आरोपी हे गुजरात व राजस्थान पोलीस दलातील कनिष्ठ पोलीस अधिकारी आहेत. सोहराबुद्दीन, त्याची पत्नी कौसर बी आणि त्याचा सहकारी तुलसीराम प्रजापती यांच्या हत्येचा गुन्हा या सर्व आरोपींवर नोंदविण्यात आला होता. ंंं

Web Title: Sohrabuddin encounter: Challenge the acquittal of the accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.