"सोनिया गांधींचं काश्मीरच्या 'शत्रूंशी' कनेक्शन"! भाजप खासदाराचा गांधी कुटुंबावर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2024 01:33 PM2024-12-09T13:33:35+5:302024-12-09T13:34:49+5:30

भारतीय जनता पक्षाने माजी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावर पुन्हा एकदा मोठा हल्ला चढवला आहे. अमेरिकेने खंडन केल्यानंतरही, सोनिया ...

Sonia Gandhi's connection with the 'enemies' of Kashmir BJP MP makes serious allegation on Gandhi family | "सोनिया गांधींचं काश्मीरच्या 'शत्रूंशी' कनेक्शन"! भाजप खासदाराचा गांधी कुटुंबावर गंभीर आरोप

"सोनिया गांधींचं काश्मीरच्या 'शत्रूंशी' कनेक्शन"! भाजप खासदाराचा गांधी कुटुंबावर गंभीर आरोप

भारतीय जनता पक्षाने माजी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावर पुन्हा एकदा मोठा हल्ला चढवला आहे. अमेरिकेने खंडन केल्यानंतरही, सोनिया गांधी यांचे जॉर्ज सोरोस फाउंडेशनसोबत चांगले संबंध असल्याच्या आरोप भाजपने केला आहे. ही संघटना काश्मीरला एक स्वतंत्र देश म्हणून स्थापन करण्याच्या कल्पनेचे समर्थन करते.
 
यासंदर्भात, सत्ताधारी भाजपने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर अनेक पोस्ट करत म्हटले आहे की, सोनिया गांधी यांचा हा संबंध भारताच्या अंतर्गत प्रकरणांमध्ये परदेशी संस्थांचा प्रभाव दर्शवतो. तसेच, भारताला अस्थिर करण्याच्या प्रयत्नांच्या समर्थनासंदर्भातील भाजपने केलेले आरोप अमेरिकेने फेटाळले असतानाही, आपण या संदर्भात लोकसभेत विरोधीपक्ष नेते राहुल गांधी यांना 10 प्रश्न विचारणार आहोत, असे खासदार निशिकांत दुबे यांनी म्हटले आहे.

निशिकांत दुबे यांनी केले आहेत असे आरोप -
निशिकांत दुबे यांनी पुन्हा एकदा दावा केला आहे की, मीडिया पोर्टल ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट (ओसीसीआरपी) आणि हंगेरियन-अमेरिकन व्यवसायिकाने भारताच्या अर्थव्यवस्थेला नुकसान पोहोचवण्यासाठी आणि मोदी सरकारला बदनाम करण्यासाठी विरोधीपक्षांसोबत हातमिळवणी केली आहे.

सोनिया गांधींचे नाव घेत केला गंभीर सवाल... -
भाजपने दावा केला की, फोरम ऑफ डेमोक्रॅटिक लीडर्स इन एशिया पॅसिफिक (FDL-AP) फाउंडेशनच्या सह-अध्यक्ष म्हणून, सोनिया गांधी जॉर्ज सोरोस फाऊंडेशनच्या माध्यमाने अर्थसहाय्यित संस्थेशी संबंधित आहेत. एका वृत्तात याचा उल्लेख करत म्हणण्यात आले आहे की, सोनिया गांधी आणि एका अशा संघटनेचा संबंध, जी काश्मीरला एक स्वतंत्र देश म्हणून स्थापन करण्याच्या कल्पनेचे समर्थन करते, भारताच्या अंतर्गत प्रश्नांवर परदेशी संस्थांचा प्रभाव आणि अशा संबंधांचा राजकीय प्रभाव दर्शवतो."

Web Title: Sonia Gandhi's connection with the 'enemies' of Kashmir BJP MP makes serious allegation on Gandhi family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.