अॅपलच्या मदतीने वाढवणार भारतीय रेल्वेचा वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 09:52 PM2017-07-21T21:52:52+5:302017-07-21T21:52:52+5:30
भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. आता रेल्वेचा वेग वाढवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 21 - भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. आता रेल्वेचा वेग वाढवण्यासाठी हालचाली सुरू झाल्या असून, त्यासाठी अॅपलसारख्या कंपन्यांची मदत घेण्यात येणार आहे. रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज ही माहिती दिली.
मोदी सरकार सत्तेवर आल्यानंतर आणि सुरेश प्रभू यांनी रेल्वे मंत्रालयाच्या कार्यभार स्वीकारल्यापासून भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणासाठी विविध घोषणा करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भारतीय रेल्वेचा वेग वाढवून 600 किमी प्रति तास करण्यावर सरकारची नजर आहे. त्यासाठी अॅपलसारख्या जागतिक कंपन्यांशी चर्चा करण्यात येत आहे, असे सुरेश प्रभू यांनी सांगितले. तसेच देशातील सर्वात जास्त रेल्वे वर्दळ असलेल्या दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-कोलकाता या मार्गांवर गतिमान एक्स्प्रेसचा वेग वाढवण्यासाठी नीती आयोगाने 18 हजार कोटी रुपयांच्या निधीच्या प्रस्तावास मंजुरी देण्यात आल्याचेही प्रभू यांनी सांगितले. हे काम झाल्यानंतर गतिमान एक्स्प्रेसचा वेग वाढून 200 किमी प्रतितास होईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
अधिक वाचा
(सायन्स एक्सप्रेसमुळे पर्यावरणाबाबतच्या जाणिवा प्रगल्भ होण्यास मदत : सुरेश प्रभू )
( पाच वर्षात भारतीय रेल्वेचा कायापालट होणार - सुरेश प्रभू )
( रेल्वे प्रवाशांना अत्याधुनिक सेवा मिळाव्यात यासाठी प्रयत्नशील : सुरेश प्रभू )
(सायन्स एक्सप्रेसमुळे पर्यावरणाबाबतच्या जाणिवा प्रगल्भ होण्यास मदत : सुरेश प्रभू )
( पाच वर्षात भारतीय रेल्वेचा कायापालट होणार - सुरेश प्रभू )
( रेल्वे प्रवाशांना अत्याधुनिक सेवा मिळाव्यात यासाठी प्रयत्नशील : सुरेश प्रभू )
"सहा ते आठ महिन्यांपूर्वी सरकारने रेल्वेचा वेग 600 किमीपर्यंत वाढवण्याच्या दिशेने काम करण्यासाठी काही मोठ्या कंपन्यांना बोलावण्यात आले होते. आम्ही अॅपलसारख्या कंपन्यांशी आधीपासूनच चर्चा करत आहोत. मात्र या विकासासाठी तंत्रज्ञानाची आयात केली जाणार नाही. तर ते देशातच विकसित केले जाईल,त्याबरोबरच भारतीय रेल्वेसाठी सुरक्षा हा चिंतेचा विषय आहे. त्यासाठी असे डबे विकसित करण्यात येत आहेत जे रेल्वेतील बिघाडाविषयी माहिती देतील," असे प्रभू म्हणाले.