स्पाइस जेटची प्रजासत्ताक दिनानिमित्त जबरदस्त ऑफर, 769 रुपयांत करा विमान प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2018 06:00 PM2018-01-22T18:00:37+5:302018-01-22T18:00:56+5:30
प्रजासत्ताक दिनानिमित्तानं स्पाइस जेट या विमान कंपनीनं प्रवाशांसाठी जबरदस्त ऑफर आणली आहे. स्पाइस जेटनं प्रवाशांना तिकिटात सवलत देऊ केली असून, ग्रेट रिपब्लिक डे सेलच्या नावानं ही ऑफर प्रवाशांना उपलब्ध करून दिली आहे.
नवी दिल्ली- प्रजासत्ताक दिनानिमित्तानं स्पाइस जेट या विमान कंपनीनं प्रवाशांसाठी जबरदस्त ऑफर आणली आहे. स्पाइस जेटनं प्रवाशांना तिकिटामध्ये सवलत देऊ केली असून, ग्रेट रिपब्लिक डे सेलच्या नावानं ही ऑफर प्रवाशांसाठी उपलब्ध आहे. ज्यात देशांतर्गत प्रवासासाठी 769 रुपयांपासून तिकीट मिळणार आहे. तर आंतरराष्ट्रीय विमान प्रवासासाठी तुम्हाला 2469 रुपये मोजावे लागणार आहेत. एअरलाइन्सनं वेबसाइटवर याची माहिती उपलब्ध करून दिली आहे.
ग्रेट रिपब्लिक डे सेलच्या अंतर्गत 22 ते 25 जानेवारीपर्यंत 12 डिसेंबर 2018 पर्यंत ट्रॅव्हल्स पीरियड असणार आहे. देशांतर्गत प्रवाशांना चांगाल प्रवास देण्यासाठी स्पाइस जेट ही भारतातली तिसरी सर्वात मोठी एअरलाइन्स कंपनी आहे. प्रवासी या ऑफरचा फायदा मोबाइल अॅपच्या माध्यमातूनही उचलू शकतात. या ऑफरला कोणत्याही दुस-या ऑफरशी जोडता येणार नाही. तसेच ग्रुप बुकिंगवर ही ऑफर लागू नसेल. ही ऑफर मर्यादित वेळेसाठी उपलब्ध आहे. त्यामुळे जे ग्राहक लवकरात लवकर या ऑफर अंतर्गत तिकीट बुक करतील त्यांनाचा याचा फायदा उचलता येणार आहे. एअरलाइन्सची वेबसाइट, मोबाइल अॅप, ट्रॅव्हल्स पोर्टल आणि एजंटांच्या माध्यमातून तिकीट बुक केल्यास याचा लाभ मिळणार आहे. मोबाइल अॅपच्या माध्यमातून तिकीट बुक केल्यास तुम्हाला अतिरिक्त सवलतही मिळू शकते. यापूर्वी इंडिगो आणि विस्तारा एअरलाइन्सही अशाच प्रकारच्या काही ऑफर घेऊन आल्या होत्या.
फक्त 99 रुपयांत करा 'या' सात शहरांचा विमान प्रवास
सामान्यांना स्वस्तात विमान प्रवास करता यावा, यासाठी स्वतःची ओळख निर्माण करणा-या एअर एशिया इंडिया या विमान कंपनीनं एक नवी ऑफर आणली होती. भारतातील सात मोठ्या शहरांचा सर्वात कमी भाड्यामध्ये आता तुम्हाला प्रवास करता येणार आहे. एअर एशिया या कंपनीनं या योजनेची घोषणा केली असून, त्यासाठी तुम्हाला 99 रुपये अथवा त्याहून अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. एअर एशिया कंपनीनं 99 रुपयांमध्ये तुम्हाला बंगळुरू, हैदराबाद, कोची, कोलकाता, नवी दिल्ली, पुणे आणि रांचीचा प्रवास उपलब्ध करून दिला आहे. एअर एशियाने वर्षअखेरनिमित्त स्वस्तात विमान प्रवास करण्याची योजना जाहीर केली होती. या योजनेंतर्गत देशांतर्गत विमान प्रवास अवघ्या 1299 रुपयांत, तर आंतरराष्ट्रीय प्रवास 2399 रुपयांत करता येणार होतं. ही सवलत योजना मर्यादित काळासाठी होती. तसेच 31 मार्च 2018 पर्यंत प्रवास करता येणार आहे.
फक्त 799 रुपयात करा विमान प्रवास
विस्ताराने 'फ्रीडम टू फ्लाय' या ऑफरअंतर्गत हवाई तिकिटावर घसघशीत डिस्काऊंट दिला आहे. या योजनेमध्ये इकॉनॉमी क्लासचे तिकीट 799 रुपये तर, प्रीमियम इकॉनॉमी वर्गाचे तिकीट 2,099 रुपये आहे. मर्यादित कालावधीसाठी ही ऑफर आहे. या ऑफरमुळे प्रवाशांना गोवा, पोर्ट ब्लेअर, लेह, लडाख, जम्मू, श्रीनगर, कोच्ची, गुवहाटी, अमृतसर आणि भुवनेश्वर या पर्यटनस्थळी जाण्याचा अॅडव्हान्स प्लान करण्याची संधी आहे. या ऑफर अंतर्गत दिल्ली, कोलकाता, मुंबई, हैदराबाद आणि बंगळुरु या मेट्रो शहरांचा सुद्धा प्रवास करता येईल.