नवी दिल्ली: भारतात मान्यता देण्यात आलेली कोरोनाची तिसरी लस ‘स्पुतनिक व्ही’ लवकरच बाजारपेठेत उपलब्ध होणार आहे. लसीचे सॉफ्ट लँच करण्यात आले असून, लसीचा पहिला डोस हैदराबादमध्ये दिल्याची माहिती डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीजतर्फे देण्यात आली. डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरीजने रशियन डायरेक्ट इनव्हेसमेंट फंडसोबत या लसीचे उत्पादन आणि विक्रीबाबत करार केला आहे. यासोबतच एकच डोस असलेली स्पुतनिक लाईट ही लसही जूनच्या अखेरपर्यंत भारतात दाखल होण्याची शक्यता आहे. (Sputnik-V vaccine in India, ‘single dose’ will be coming soon)भारतात देशांतर्गत उत्पादन सुरू होईपर्यंत "स्पुतनिक व्ही" लस सुरूवातीच्या काळात आयात करण्यात येणार आहे. सर्वप्रथम दीड लाख डोसची पहिली खेप १ मे रोजी दाखल झाली होती. कसौली येथील केंद्रीय प्रयोगशाळेत तपासणी आणि चाचणी झाल्यानंतर लस वापरण्यास १३ मे रोजी मंजुरी देण्यात आली आहे. आता लस पुढील आठवड्यात बाजारपेठेत उपलब्ध होणार आहे, अशी माहिती निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितले. टप्प्याटप्प्याने होणार आयातसध्या लसीची आयात करण्यात येत आहे. ‘स्पुतनिक व्ही’ लसीचे पुढील दोन महिन्यांत ३.६ कोटी डोस मिळणे अपेक्षित असल्याची माहिती रमणा यांनी दिली. लसीची दुसरी खेपही शुक्रवारी दाखल झाली. ‘स्पुतनिक व्ही’ लस ९१ टक्के प्रभावी असल्याचे चाचण्यांमधून आढळले होते. भारतात ६ कंपन्यांसोबत रशियन डायरेक्ट इनव्हेटमेंट फंडने करार केले आहेत.
देशात कोरोनाचे नवे रुग्ण, मृत्यूमध्ये घट- देशात गेल्या चोवीस तासांत कोरोनाचे नवे रुग्ण व मृत्यू यांच्यात घट झाली आहे. शुक्रवारी कोरोनाचे ३ लाख ४३ हजार नवे रुग्ण आढळून आले, तर ४ हजार जणांचा मृत्यू झाला. - कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या २ कोटी ४० लाखांवर पोहोचली असून, त्यातील २ कोटी ७९ हजार लोक बरे झाले आहेत. गुरुवारी कोरोनाचे ३ लाख ४८ हजार नवे रुग्ण सापडले होते व ४२०५ जणांचा बळी गेला होता.
राज्यांना १.९२ कोटी डोस मिळणारकेंद्र सरकार रविवारी १६ मेपासून ते ३१ मेपर्यंतच्या पंधरवड्यात राज्यांना कोरोना लसींच्या १ कोटी ९२ लाख डोसचा मोफत पुरवठा करणार आहे, असे केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.
देशातील एकूण कोरोना रुग्णांपैकी ८३.२ टक्के रुग्ण महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, तामिळनाडू या चार राज्यांमध्ये आहेत.