NCRमध्ये PNB हून मोठा घोटाळा, SRS ग्रुपकडून 30 हजार कोटींचा गंडा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2018 05:37 PM2018-04-05T17:37:59+5:302018-04-05T17:37:59+5:30

दिल्ली-एनसीआरमध्ये पंजाब नॅशनल बँकेहून मोठा घोटाळा झाल्याचं समोर आलं आहे. रिअल इस्टेटमधली नावाजलेली कंपनी असलेल्या SRS ग्रुपनं 20 हजार कुटुंबीयांचे 30 हजार कोटी रुपये हडप केल्याला आरोप आहे.

SRS Group chairman Anil Jindal, four associates nabbed by Faridabad Police | NCRमध्ये PNB हून मोठा घोटाळा, SRS ग्रुपकडून 30 हजार कोटींचा गंडा

NCRमध्ये PNB हून मोठा घोटाळा, SRS ग्रुपकडून 30 हजार कोटींचा गंडा

Next

नवी दिल्ली- दिल्ली-एनसीआरमध्ये पंजाब नॅशनल बँकेहून मोठा घोटाळा झाल्याचं समोर आलं आहे. रिअल इस्टेटमधली नावाजलेली कंपनी असलेल्या SRS ग्रुपनं 20 हजार कुटुंबीयांचे फ्लॅट देण्याच्या नावाखाली 30 हजार कोटी रुपये हडप केल्याला आरोप आहे. रिअल इस्टेटमधील हा सर्वात मोठा असल्याचं बोललं जातंय. या घोटाळ्यात हरियाणा पोलिसांनी SRS समूहाचे अध्यक्ष अनिल जिंदालसहीत पाच जणांना अटक केली आहे. यात बिशन बन्सल, नानक चंद तायल, विनोद मामा आणि देवेंद्र अधाना यांचा समावेश आहे.

SRS समूहावर बँकांकडून हजारो कोटींचं कर्ज घेऊनही परत न केल्याचा आरोप आहे. या पाच जणांच्या अटकेनंतर पोलीस उपायुक्त विक्रम कपूर यांनी पत्रकार परिषद घेत याची माहिती दिली आहे. आरोपींना दिल्लीतल्या महिपालपूरमधल्या एका हॉटेलमधून अटक करण्यात आली आहे. सर्व आरोपींना जिल्हा न्यायालयात हजर करणार आहोत. तसेच आरोपींना पोलीस कोठडी मिळावी, याची मागणी करणार असल्याचंही विक्रम कपूर यांनी सांगितलं.



या सर्व आरोपींवर चार महिन्यांपूर्वीपासून पोलिसांत कलम 420, 406, 120 बी व हरियाणा प्रोटेक्शन ऑफ इंट्रेस्ट ऑफ डिपोझिटर इन एफई अॅक्ट 2013अंतर्गत 22 गुन्हे दाखल आहेत. अनिल जिंदल यांनी एसआरआस मॉलच्या माध्यमातून स्वतःच्या व्यवसायाला सुरुवात केली होती. एसआरएस कारोभार दिल्ली-एनसीआरसह उत्तर प्रदेश, पंजाब, चंदीगड, राजस्थानमधल्या विविध प्रदेशांत पसरलेला आहे. अनिल जिंदल यांनी एसआरएस मॉलनंतर रिअल इस्टेट क्षेत्रात पाऊल ठेवलं. परंतु मंदीच्या काळात अनिल जिंदल यांना झटका बसला आहे. या घोटाळेबाजांना भाजपा आणि संघाचा वरदहस्त असल्याचीही चर्चा आहे. 

Web Title: SRS Group chairman Anil Jindal, four associates nabbed by Faridabad Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.