पाण्याची बचत करणाऱ्या उपकरणांना देणार स्टार रेटिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2020 06:21 AM2020-08-22T06:21:51+5:302020-08-22T06:21:51+5:30

जल क्षमतेच्या आधारावर राष्ट्रीय जल अभियानातहत जलशक्ती आणि भारतीय मानक विभागाने मानांकन निश्चित केले आहेत.

Star rating for water saving devices | पाण्याची बचत करणाऱ्या उपकरणांना देणार स्टार रेटिंग

पाण्याची बचत करणाऱ्या उपकरणांना देणार स्टार रेटिंग

googlenewsNext

नितीन अग्रवाल 
नवी दिल्ली : टीव्ही, फ्रीज, एअर कंडिशनर यासारख्या विजेवर चालणाºया उपकरणांप्रमाणे आता नळ, शॉवर, फ्लश सिस्टर्नलाही तारांकित मानांकन (स्टार रेटिंग) दिले जाणार आहेत. जल क्षमतेच्या आधारावर राष्ट्रीय जल अभियानातहत जलशक्ती आणि भारतीय मानक विभागाने मानांकन निश्चित केले आहेत.
भारतीय मानक विभागाने (बीआयएस) पाण्यासाठी वापरण्यात येणारी उपकरणे आणि स्वच्छतेच्या उपकरणांच्या क्षमतेनुसार स्टार रेटिंग देण्यासाठीचा मसुदा तयार केला आहे. क्षमतेबरोबरच पाणी बचत करणारे नळ आणि फ्लशला रेटिंग दिली जाईल. या उपकरणांतून प्रतिमिनिट किती पाणी येते, या आधारे स्टार रेटिंग ठरविली जाईल. वापरानुसार स्वतंत्र रेटिंग दिली जाईल. प्रतिमिनिट १० लिटर पाण्याचा वापर करणाºया शॉवरला एक स्टार, ८ लिटरच्या शॉवरला दोन आणि ६.८ लिटरच्या शॉवरला तीन स्टार दिले जातील. वॉशबेसिनच्या तोटीबाबत प्रतिमिनिट ८ लिटर पाणी प्रवाहित होणाºया तोटीला एक, ६ लिटरसाठी दोन आणि तीन लिटरसाठी तीन स्टार दिले जातील.
>आरओ, कूलर वॉशिंग मशीनला रेटिंग...
जलशक्ती मंत्रालयाच्या एका अधिकाºयानुसार स्वच्छता (सॅनिटरी) उपकरणांनंतर पाण्यासाठी वापरल्या जाणाºया विजेच्या उपकरणांना रेटिंग लागू केली शकते. यात प्रामुख्याने आरओ, प्युरिफायर असतील. जल संवर्धनावर ज्या प्रकारे भर दिला जात आहे, त्यावरून वीज आणि जल क्षमता मानांकन अनेक उपकरणांसाठी अनिवार्य केले जाऊ शकते.याशिवाय वॉशिंग मशीन, डिश वॉशर, कूलर यासारख्या उपकरणांना पाण्याच्या वापरानुसार रेटिंग दिली जाईल. यामुळे पाण्याची बचत करण्यास चालना मिळेल आणि लोक अशाच उपकरणांची निवड करून पाण्याची बचत करण्याचे उद्दिष्ट पूर्ण शकतील.

Web Title: Star rating for water saving devices

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.