नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’मधून पंढरपूर वारीचे महत्त्व सांगून सव्वाशे कोटी देशवासीयांना एकदा तरी विठ्ठलाच्या दर्शनाला जाण्याची विनंती केली. त्यानंतर देशभरातून फोन, ई-मेल आलेत. लोकांनी ज्या वेळी पंढरपूरला कसे पोहोचायचे? असा प्रश्न विचारला, तेव्हा मात्र मला लाज वाटली, अशा शब्दांत सोलापूरचे खासदार शरद बनसोडे यांनी लोकसभेत भावनांना वाट मोकळी करून दिली. धार्मिक स्थळ असूनही पंढरपूरला पोहोचण्यासाठी केवळ शुक्रवार, शनिवार व रविवारीच रेल्वे गाडी असते. सर्व देशवासीयांना पंढरपूरला भेट द्यावी, असे पंतप्रधानांना वाटत असेल, तर पंढरपूरला जाण्यासाठी रोज रेल्वे गाडी असावी, अशी विनंती बनसोडे यांनी सरकारला केली.मानसरोवरला जाणाऱ्यांची चीनकडून अडवणूककैलाश मानसरोवर यात्रेला जाणा-या भाविकांची चीन सरकारकडून अडवणूक केली जात असल्याची गंभीर माहिती मावळचे खा. श्रीरंग अप्पा बारणे यांनी दिली. नेपाळ-तिबेटमार्गे कैलाश मानसरोवर यात्रा पूर्ण करावी लागते. राजकारणी, पत्रकारांना चीन सरकार व्हिसा देत नाही. लोकांची अडवणूक केली जाते. तिबेट-चीन सीमेवर इमिग्रेशन केंद्र आहे. तेथे भाविकांना पाच ते सहा तास वाट पाहावी लागते, अशा अनेक अडचणी लोकांना येतात. लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न चीनी अधिकारी करतात, अशी तक्रार बारणे यांनी केली.>बँक कर्ज देत नाहीमहाराष्ट्र व देशात होत असलेल्या शेतकरी आत्महत्येस राष्ट्रीय बँकांमधून कर्ज न मिळणे हे देखील महत्त्वाचे कारण असल्याचा दावा उस्मानाबादचे खा. प्रा. रवींद्र गायकवाड यांनी केला. ते म्हणाले की, सरकारने कर्ज वितरणासाठी एका गावाला एक बँक जोडली.पण पन्नास हजारापर्यंतची थकबाकी असल्यास बँक सरळ एनपीएमध्ये टाकते. त्यामुळे शेतकºयांना दुसरे कर्ज मिळत नाही. व्यापाºयांना, उद्योजकांना सहज कर्ज मिळते. शेतकºयांनादेखील त्यांच्याकडे असलेल्या जमिनीच्या किंमतीच्या पटीत कर्ज मिळावे. सहकारी बँकांमध्ये असे कर्ज मिळत असे.
पंढरपूरसाठी देशभरातून रेल्वे गाड्या सुरू करा- बनसोडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 09, 2018 4:28 AM