राजकारणातही स्टार्ट-अप, वारंवार लॉन्च करावे लागते, पण...; पंतप्रधान मोदींचा टोमणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 05:33 PM2024-03-20T17:33:40+5:302024-03-20T17:34:52+5:30

यावेळी, देश 2047 च्या विकसित भारतच्या रोडमॅपवर काम करत आहे. यामुळे स्टार्ट अप महाकुंभचे अत्यंत महत्व आहे, असेही मोदी यांनी म्हटले आहे.  

Start-ups in politics too Have to launch frequently Sarcasm of Prime Minister Modi to rahul gandhi | राजकारणातही स्टार्ट-अप, वारंवार लॉन्च करावे लागते, पण...; पंतप्रधान मोदींचा टोमणा

राजकारणातही स्टार्ट-अप, वारंवार लॉन्च करावे लागते, पण...; पंतप्रधान मोदींचा टोमणा

राजकारणात काहींना वारंवार लॉन्च करण्याची गरज पडते. तर स्टार्टअपच्या जगात जेव्हा एखादी  व्यक्ती अपयशी ठरते, तेव्हा दुसरा मार्ग स्वीकारते, असे पंतप्रध नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्याकडे राहुल गांधींना टोमणा म्हणून बघितले जात आहे. कारण राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा नुकताच समारोप झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी भारत मंडपममध्ये सुरू असलेल्या 'स्टार्टअप महाकुंभ'ला संबोधित करत होते. यावेळी, देश 2047 च्या विकसित भारतच्या रोडमॅपवर काम करत आहे. यामुळे स्टार्ट अप महाकुंभचे अत्यंत महत्व आहे, असेही मोदी यांनी म्हटले आहे.  

स्टार्ट-अप लॉन्च तर अनेक लोक करतात... -
स्टार्ट-अप महाकुंभमध्ये स्टार्ट-अप आणि राजकारणाची तुलना करताना कुणाचेही नाव न घेता मोदी म्हणाले, ‘‘बरेच लोक स्टार्ट-अप लॉन्च करतात. राजकारणात तर अधिक... आणि वारंवार लॉन्च करावे लागते. मात्र, आपल्यात आणि त्यांच्यात हा फरक आहे की, आपण प्रयोगशील असतात, जर एक लॉन्च झाला नाही तर लगेच दुसऱ्यावर जाता."

मोदी पुढे म्हणाले, भारताने गेल्या काही दशकांत IT आणि सोफ्टवेअर सेक्टरमध्ये आपी छाप पाडली आहे. आता आपण भारतात. इनोव्हेशन आणि स्टार्टअप कल्चरचा ट्रेंड सातत्याने वाढताना दिसत आहे. यावेळी मोदींनी सलग तिसऱ्यांदा सत्तेवर येण्याचा आणि एक एप्रिल, 2024 पासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षासाठी पूर्ण बजेट सादर करण्याचा विश्वासही व्यक्त केला.
 

Web Title: Start-ups in politics too Have to launch frequently Sarcasm of Prime Minister Modi to rahul gandhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.