मुलांच्या मृत्यूस राज्य सरकार जबाबदार, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा - कॉंग्रेस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 11:27 PM2017-08-12T23:27:12+5:302017-08-12T23:27:18+5:30

मेडिकल कॉलेजमधील मुलांच्या मृत्यूस राज्य सरकार जबाबदार असून या प्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आरोग्यमंत्री सिद्धार्थ नाथ सिंह यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसने शनिवारी केली आहे.

 State Government responsible for the death of children, Chief Minister resigns - Congress | मुलांच्या मृत्यूस राज्य सरकार जबाबदार, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा - कॉंग्रेस

मुलांच्या मृत्यूस राज्य सरकार जबाबदार, मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा - कॉंग्रेस

Next

नवी दिल्ली / गोरखपूर : मेडिकल कॉलेजमधील मुलांच्या मृत्यूस राज्य सरकार जबाबदार असून या प्रकरणी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि आरोग्यमंत्री सिद्धार्थ नाथ सिंह यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसने शनिवारी केली आहे.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी
यांनी म्हणाल्या आहे की, यंत्रणेतील निष्काळजीपणा आणि गैरवर्तन यामुळे जी कुटुंबे या दुर्घटनेची
शिकार झाली आहोत,
त्यांच्यासोबत आम्ही आहोत. उत्तरप्रदेश सरकारने या घटनेची दखल घ्यावी आणि जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी.
बाबा राघवदास मेडिकल कॉलेजला शनिवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद, राज बब्बर आदी नेत्यांनी भेट दिली. या घटनेबद्दल दु:ख व्यक्त करुन आझाद म्हणाले की, राज्य सरकारच्या ढिसाळ कारभाराचे हे बळी आहेत. त्यास राज्य सरकार जबाबदार आहे. पण, यासाठी केवळ डॉक्टरांना जबाबदार धरता येणार नाही. आरोग्यमंत्री व सचिव यांनी तात्काळ राजीनामा द्यावा.
काँगे्रसचे प्रवक्ते मनीष तिवारी म्हणाले की, मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांनी प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्यावा. हॉस्पिटल प्रशासन, आॅक्सिजन पुरवठादार आणि जिल्हा प्रशासन जसे दोषी आहेत, तसेच मुख्यमंत्र्यांची या प्रकरणात नैतिक जबाबदारी आहे. जबाबदार व्यक्तींवर हत्येचे
आरोप ठेवले जावेत. या घटनेची जबाबदारी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री
व आरोग्यमंत्री यांनी स्वीकारायला हवी.

कुटुंबीयांना भरपाई द्या - यादव
या घटनेला राज्य सरकार जबाबदार असून दोषींवर कारवाई करुन प्रत्येक मुलाच्या कुटुंबीयांना प्रत्येकी २० लाख रुपयांची भरपाई द्यावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी केली आहे.

Web Title:  State Government responsible for the death of children, Chief Minister resigns - Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.