स्टीलच्या गोळ्या बनल्या लष्करासाठी मोठी चिंता; अत्याधुनिक बुलेटप्रूफ जॅकेट नसल्याने धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 05:24 AM2023-12-27T05:24:03+5:302023-12-27T05:25:07+5:30

या गोळ्या चिलखती वाहनांनाही भेदत असल्याने दहशतवादी या गोळ्यांचा वापर करून दहशत पसरवत आहेत.

steel bullets became a major concern for the indian army risk of not having modern bulletproof jacket | स्टीलच्या गोळ्या बनल्या लष्करासाठी मोठी चिंता; अत्याधुनिक बुलेटप्रूफ जॅकेट नसल्याने धोका

स्टीलच्या गोळ्या बनल्या लष्करासाठी मोठी चिंता; अत्याधुनिक बुलेटप्रूफ जॅकेट नसल्याने धोका

सुरेश एस. डुग्गर, लोकमत न्यूज नेटवर्क, जम्मू ( Marathi News ): जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या प्राणघातक हल्ल्यांमध्ये स्टीलच्या गोळ्यांचा वापर भारतीय लष्करासाठी चिंतेचा विषय बनला आहे, कारण अद्याप आपल्या सर्व सैनिकांना अत्याधुनिक ‘बुलेटप्रूफ जॅकेट’ (श्रेणी ४) प्रदान करू शकलेले नाही. या गोळ्या चिलखती वाहनांनाही भेदत असल्याने दहशतवादी या गोळ्यांचा वापर करून दहशत पसरवत आहेत.

राजौरी आणि पूंछमध्ये लष्करावर झालेल्या प्रत्येक जीवघेण्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी या गोळ्यांचा वापर केला आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या कारणामुळे बहुतांश सैनिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दहशतवादी जवानांचे बुलेटप्रूफ जॅकेट, बुलेटप्रूफ टोपी आणि पट्टा भेदण्यात स्टीलच्या गोळ्यांना यश आले. या गोळ्यांचा तडाखा चिलखती वाहनांनाही सहन होत नव्हता. 

स्टीलची गोळी घातक का?

एके-४७ किंवा इतर कोणत्याही रायफलमध्ये वापरल्या जाणाऱ्या बुलेटचा पुढचा भाग तांब्याचा असतो, जो बुलेटप्रूफ स्टील किंवा काचेच्या चिलखतीमध्ये घुसू शकत नाही. स्टील बुलेट मात्र बुलेटप्रूफमध्ये सहज प्रवेश करू शकतात.  

स्टीलच्या गोळ्यांचा या हल्ल्यांत वापर...

ऑगस्ट २०१६ : पुलवामा येथील सुरक्षा दलाच्या तळावर झालेला जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांचा हल्ला.
 
३१ डिसेंबर २०१७ : पुलवामा येथील लेथपोरा येथील सीआरपीएफ कॅम्पवर झालेला आत्मघातकी हल्ला.

जून २०१९ : अनंतनागमध्ये सुरक्षा दलावर झालेला हल्ला.

मार्च २०२३ : शोपियाँमध्ये मारला गेलेला जैशचा दहशतवादी सज्जाद याच्याकडेही स्टीलची गोळी सापडली होती.

पाकिस्तानातून पुरवठा

या स्टील गोळ्या पाकिस्तानातून काश्मीरमधील दहशतवाद्यांपर्यंत पोहोचतात आणि चीनने त्यांचे तंत्रज्ञान पाकिस्तानला दिले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये  दहशतवाद्यांनी स्टील कोअर बुलेट आणि कॅनेडियन नाइट साइट्सचा वापर करण्यास सुरुवात केली आहे, जे अमेरिकेच्या नेतृत्वाखालील नाटो आघाडीला अफगाणिस्तानातून माघार घेण्यास भाग पाडल्यानंतर तेथेच सोडण्यात आले होते, असेही बोलले जाते.
 

Web Title: steel bullets became a major concern for the indian army risk of not having modern bulletproof jacket

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.