काश्मीरमध्ये लष्कराची धडक कारवाई; दिवसभरात पाच दहशतवाद्यांना कंठस्नान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2018 05:41 PM2018-10-19T17:41:30+5:302018-10-19T17:41:30+5:30
काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलांनी आज घडक कारवाई करून दोन वेगवेगळ्या चकमकींमध्ये एकूण पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.
श्रीनगर - काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलांनी आज घडक कारवाई करून दोन वेगवेगळ्या चकमकींमध्ये एकूण पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. शुक्रवारी सकाळी बारामुला जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ उडालेल्या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. तर दुपारी बारामुला जिल्ह्यातील क्रलहार येथे दहशतवादी आणि लष्कराच्या जवानांमध्ये पुन्हा एकदा चकमक उडाली. या चकमकीत लष्कराने दोन जवानांना कंठस्नान घातले. ठार मागण्यात आलेल्या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे.
उत्तर काश्मीरमध्ये शुक्रवारी सकाळी नियंत्रण रेषेवर बोनियार येथे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक उडाली. या चकमकीत लष्कराने तीन दहशतवाद्यांना ठार मारले. या दहशतवाद्यांकडून चार एके-47 आणि चार खाद्यपदार्थांच्या बॅग जप्त करण्यात आल्या.
#JammuAndKashmir: Three terrorists have been neutralised in an encounter in Baramulla's Boniyar. 4 AK-47 Rifles & 4 haversacks have been seized. Operation is underway.
— ANI (@ANI) October 19, 2018
तर बारामुला जिह्यातील क्रलहार येथे दहशतवादी आणि लष्करामध्ये चकमक उडाली. यावेळी झालेल्या गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाले. या दहशतवाद्यांकडून एके-201 आणि एक चिनी पिस्तुल जप्त करण्यात आले.
Two terrorists were neutralised in exchange of fire with police party in Kralhaar, Baramulla. AK-201 assault rifle, 2 Chinese pistols and other weapons were recovered. #JammuAndKashmir (visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/GcMVe8AYup
— ANI (@ANI) October 19, 2018