दिल्लीत प्राणीसंग्रहालयात वाघाच्या हल्ल्यात विद्यार्थी ठार
By admin | Published: September 23, 2014 02:32 PM2014-09-23T14:32:01+5:302014-09-23T16:31:09+5:30
दिल्लीतील एका प्राणीसंग्रहालयातील वाघाने हल्ला केल्याने १२वीत शिकणा-या विद्यार्थ्याला जीव गमवावा लागला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २३ - राजधानी दिल्लीतील एका प्राणीसंग्रहालयातील वाघाने हल्ला केल्याने १२वीत शिकणा-या विद्यार्थ्याला जीव गमवावा लागला आहे. मकसुद असे या विद्यार्थ्याचे नाव असल्याचे सांगण्यात येत आहे.
मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास ही दुर्घटना घडली. प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार वाघाला जेथे ठेवण्यात आले होते, तेथील संरक्षण भिंत कमी उंचीची असल्याने या ठिकाणी पाय घसरून हा विद्यार्थी खाली पडला त्या ठिकाणी वाघ आला. वाघासमोर या विद्यार्थ्यांने हात पाय जोडले परंतू दहा मिनिटे थांबलेल्या वाघाने अचानक या विद्यार्थ्यावर आपल्या पंजाने झडप घालून विद्यार्थ्यांला जखमी केले. वाघाने हल्ला केल्याने भेदरलेल्या विद्यार्थ्याचा यावेळी मृत्यू झाला. हा विद्यार्थी पाय घसरून पडल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणने आहे तर विद्यार्थ्याने जाणूनबुजून आतमध्ये उडी मारली असल्याचा प्राणी संग्रहालयातील अधिका-यांचा दावा आहे. अधिका-यांचा दावा खरा की प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे खरे याचा तपास होईल परंतू विद्यार्थ्याला आपला नाहक जीव गमवावा लागला हे मात्र दुर्दैवी सत्य.