विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2015 02:14 AM2015-05-22T02:14:19+5:302015-05-22T02:14:19+5:30

प्रश्नपत्रिका फुटल्याने अखिल भारतीय मेडिकल प्रवेशपूर्व चाचणी परीक्षा (२०१५-१६) पुन्हा घेणे हा ‘अंतिम उपाय’ आहे,

The students of the ground floor | विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

Next

पेपरफुटीवर याचिका : मेडिकल प्रवेशपूर्व परीक्षेचे भवितव्य अनिश्चित
नवी दिल्ली : प्रश्नपत्रिका फुटल्याने अखिल भारतीय मेडिकल प्रवेशपूर्व चाचणी परीक्षा (२०१५-१६) पुन्हा घेणे हा ‘अंतिम उपाय’ आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. मात्र आम्ही खुल्या मनाने याचा निर्णय करू, अशी पुस्तीही खंडपीठाने जोडली आहे. त्यामुळे ही परीक्षा पुन्हा होणार की काय, या चिंतेने सहा लाख विद्यार्थी व त्यांच्या पालकांचा जीव टांगणीला लागला आहे.
३ मे रोजी आॅल इंडिया प्री मेडिकल-प्री डेंटल एन्ट्रन्स टेस्ट (एआयपीएमटी) घेण्यात आली होती. या परीक्षेतील फुटलेले पेपर काही डॉक्टरांना मिळाल्याचे तसेच विविध राज्यांमधून ७५ मोबाइल फोनवरून १२३ प्रश्नांची आन्सर की प्रसारित झाल्याचे उघड झाले होते. देशभरातील अनेक विद्यार्थ्यांना याची उत्तरे मिळाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केल्यानंतर ही परीक्षाच रद्द करावी, अशी याचिका दाखल करण्यात आली. परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचा आरोप आहे. मोठ्या प्रमाणावरील या गैरप्रकारामुळे लाभान्वित झालेल्यांचा शोध घेण्यात यावा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने आता हरियाणा पोलिसांना दिले आहेत.
ही एआयपीएमटी परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी काही पालकांनी केलेली आहे. पुन्हा परीक्षा घेणे हा अंतिम उपाय आहे. तरीही त्याचा आम्ही खुल्या मनाने विचार करीत आहोत, असे न्या. ए. के. सिकरी आणि न्या. उदय यु. लळित यांच्या अवकाशकालीन पीठाने म्हटले आहे. म्हणजेच तूर्तास एआयपीएमटी परीक्षा पुन्हा घेतली जाण्याची शक्यता न्यायालयाने फेटाळलेली नाही.
या प्रकरणी हरियाणा पोलिसांना सहकार्य करण्याचे निर्देशही न्यायालयाने राज्यांच्या सक्तवसुली संचालनालयांना आणि मोबाइल कंपन्यांना दिले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी २६ मे रोजी होईल. (लोकमत न्यूज नेटवर्क)

‘सहा लाख लोकांना पुन्हा परीक्षेला बसण्यासाठी का सांगण्यात यावे? या गैरप्रकाराचा लाभ
झालेल्यांची संख्या आम्ही शोधून काढलीच पाहिजे,’
असे मतप्रदर्शनही न्यायालयाने सुनावणीदरम्यान केले.

च्या परीक्षेतील फुटलेले पेपर काही डॉक्टरांना मिळाल्याचे तसेच विविध राज्यांमधून ७५ मोबाइल फोनवरून १२३ प्रश्नांची आन्सर की प्रसारित झाल्याचे उघड झाले होते.
च्देशभरातील अनेक विद्यार्थ्यांना याची उत्तरे मिळाल्याचे पोलिसांनी स्पष्ट केल्यानंतर ही परीक्षाच रद्द करावी, अशी याचिका दाखल करण्यात आली.

 

Web Title: The students of the ground floor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.