एकच यकृत असलेल्या जुळ्यांना वेगळे करण्यात यश
By admin | Published: November 27, 2014 11:40 PM2014-11-27T23:40:12+5:302014-11-27T23:40:12+5:30
एकच सामायिक यकृत असलेल्या दोन महिने वयाच्या दोन काश्मिरी जुळ्य़ा बहिणींना प्रदीर्घ व जोखमीची शस्त्रक्रिया करून वेगळे करण्याची करामत करण्यात आली.
Next
नवी दिल्ली: ओटीपोटाने एकमेकींना चिकटलेल्या आणि दोघींमध्ये मिळून एकच सामायिक यकृत असलेल्या दोन महिने वयाच्या दोन काश्मिरी जुळ्य़ा बहिणींना प्रदीर्घ व जोखमीची शस्त्रक्रिया करून वेगळे करण्याची करामत गुडगाव येथील एका इसिपतळातील डॉक्टरांनी अलीकडेच यशस्वीपणो पार पाडली.
शबूरा आणि शफूरा अशी या दोन बहिणींची नावे असून त्यांची शरीरे ज्या प्रकारे जन्मत:च परस्परांना जोडली गेली होती त्या प्रकारच्या जुळ्य़ा मुलांना वैद्यकीय परिभाषेत ‘ऑम्फॅलोपॅगस’ असे म्हटले जाते. दोन्ही मुलांना एकत्र साधणारे ओटीपोटाचे बाह्यावरण उघडून, सामायिक यकृताचे विभाजन करून ओटीपोट पुन्हा बंद करण्याच्या शस्त्रक्रिया करून अशा जुळ्य़ांना वेगळे केले जाते.
मेदान्त मेडिसिटी इस्पितळाच्या लिव्हर इन्स्टिटय़ूटमध्ये 15 नोव्हेंबर रोजी या जुळ्य़ा बहिणींच्या विलगीकरणाच्या शस्त्रक्रिया यशस्वीपणो पार पडल्या. या जुळ्य़ांमध्ये सामायिक असलेले यकृत वगळता हृदय, आतडी यासह इतर अवयव प्रत्येकीचे स्वतंत्र असल्याने विलगीकरणांनतर या दोन्ही मुली जगण्याची शक्यता खूपच जास्त आहे, असे डॉक्टरांचे म्हणणो आहे.
इस्पितळाच्या पेडियाट्रिक गॅस्ट्रोएन्टेरॉलॉजी विभागाचे संचालक डॉ. नीलम मोहन यांनी सांगितले की, या दोघींची आतडी वेगळी पण एकमेकीच्या शरीरात पसरलेली होती. ती पुन्हा जागच्या जागी आणली गेली. दोघींमध्ये सामायिक असलेले यकृत तुलनेने खूपच मोठय़ा आकाराचे होते. त्यामुळे त्यांची 6क्: 4क् अशी विभागणी करून ती दोघींच्या शरीरांत व्यवस्थितपणो पुन्हा बसविली गेली.
लिव्हर इन्स्टिटय़ूटचे अध्यक्ष डॉ. ए. एस. सोईन म्हणाले की, दोन जुळ्य़ांमध्ये सामायिक असलेल्या यकृताची अंतर्गत संरचना नेमकी कशी असते व दोन परिपूर्ण भागांमध्ये त्यांची विभागणी कशी करायची याविषयी पाठय़पुस्तकांमध्ये कोणतीही प्रमाणित पद्धत दिलेली नाही. त्यामुळे अशा सामायिक यकृताचे विभाजन करताना अत्यधिक रक्तस्नव होण्याची व विलगीकरणानंतर यकृताच्या दोनपैकी एक किंवा दोन्ही भाग कार्य निष्पादनाच्या दृष्टीने सदोष व अपूर्ण ठरण्याची मोठी जोखीम असते. त्यामुळे या जोखमीचे काटेकोर मूल्यमापन करून व त्यावर दीर्घकाळ विचारविनिमय करून नंतरच या जुळ्य़ांना वेगळे करण्याचा निर्णय घेण्यात आला.
अशा अवस्थेतील जुळी विरळा मानली जातात व त्यांच्या जन्माचे प्रमाण लाखामध्ये एक असते. शिवाय जन्माला येणा:या अशा जुळ्य़ांपैकी 75 टक्के जुळ्य़ा मुलीच असतात. 2क्12 मध्ये मध्य प्रदेशातील बैतुल येथील एका धर्मादाय इस्पितळात अशाच प्रकारच्या 11 महिन्यांच्या जुळ्य़ांना शस्त्रक्रियेने वेगळे केले गेले होते. त्या जुळ्य़ांमध्येही एकच सामायिक यकृत होते, पण रक्तपुरवठा दोन स्वतंत्र मार्गानी होत होता. मात्र शस्त्रक्रियेनंतर 15 दिवसांनंतर त्यापैकी एका बाळाचा मृत्यू झाला होता.
आपल्या दोन्ही मुली आता स्वत:चे स्वतंत्र आयुष्य जगू शकतील याविषयी अल्लाचे आभार मानताना या जुळ्य़ांचे वडील म्हणाले की, इथे येण्याच्या आधी आम्ही सर्व आशा सोडून दिली होती. दोघींना दूध पाजणो, कपडे घालणो व झोपविणो ही दैनिक कामे करणोही आमच्यापुढे एक दिव्य होते. (वडिलांनी स्वत:चे नाव उघड न करण्याच्या अटीवर ही प्रतिक्रिया दिली).
(लोकमत न्यूज नेटवर्क)
4या जुळ्य़ांवर शस्त्रक्रिया करणो डॉक्टरांच्या दृष्टीने आव्हानात्मक होते. शस्त्रक्रियेपूर्वीच्या रक्त तपासण्या, एक्स-रे व स्कॅन काढणो अशा एरवी साध्या वाटणा:या गोष्टी करण्यासाठीही डॉक्टरांना नावीन्यपूर्ण मार्ग अनुसरावे लागले. एकाच टेबलवर ठेवून दोन स्वतंत्र यंत्रे लावून दोघींना स्वतंत्रपणो अॅनेस्थेशिया देणो व व्हेन्टिलेटर लावणो हेही सोपे नव्हते. शिवाय दोघींचा रक्तपुरवठा सामायिक यकृतातून जात होता त्यामुळे एकीला दिलेल्या औषधांचा व इंजेक्शनचा दुसरीवर अनपेक्षित दुष्परिणाम होण्याची अडचणही होती.