भारताच्या नव्या दूरसंचार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

By Admin | Published: November 12, 2015 12:09 AM2015-11-12T00:09:22+5:302015-11-12T00:09:31+5:30

भारताचा नवा दूरसंचार उपग्रह जीसॅट-१५ ला बुधवारी भल्या पहाटे युरोपियन अ‍ॅरियन ५ व्हीए-२२७ प्रक्षेपण वाहनाद्वारे अवकाशात यशस्वीरीत्या सोडण्यात आले.

Successful launch of India's new telecommunications satellite | भारताच्या नव्या दूरसंचार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

भारताच्या नव्या दूरसंचार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

googlenewsNext

बंगळुरू : भारताचा नवा दूरसंचार उपग्रह जीसॅट-१५ ला बुधवारी भल्या पहाटे युरोपियन अ‍ॅरियन ५ व्हीए-२२७ प्रक्षेपण वाहनाद्वारे अवकाशात यशस्वीरीत्या सोडण्यात आले. ३,१६४ किलोग्रॅम वजनाच्या जीसॅट-१५ सोबत दूरसंपर्क ट्रान्सपाँडर्स केयू-बँड आणि जीपीएसचे साह्य असलेली जीईओ आॅगमेंटेड नॅव्हिगेशन पेलोड आॅपरेटिंग एल वन आणि एल ५ बँडस्मध्ये काम करील. हे प्रक्षेपण फ्रेंच गुईयानातील कौरोऊ येथील युरोपीयन स्पेस पोर्टवर अ‍ॅरियन लाँच पॅडवरून झाले.
शेवटच्या ११ तास ३० मिनिटांची उलटगिनती सहजपणे झाल्यानंतर प्रक्षेपण वाहन अ‍ॅरियन ५ ने भारतीय प्रमाण वेळेनुसार पहाटे ३ वाजून ४ मिनिटांनी उपग्रहाला उचलले, असे इस्रोने वृत्तपत्र निवेदनात म्हटले. ४३ मिनिटे व २४ सेकंदांच्या उड्डाणानंतर जीसॅट-१५ अ‍ॅरियन ५ पासून वरच्या बाजूला लंबवर्तुळाकार अशा (जिओसिंक्रोनोऊस ट्रान्सफर आॅर्बिट-जीटीओ) भ्रमणकक्षेत चंद्राच्या पृथ्वीपासून समीपतम बिंदूपाशी आणि पृथ्वीपासून सर्वात दूर अशा ३५,८१९ किलोमीटरवर गेला. आता साध्य झालेली भ्रमणकक्षा ही ती जी अपेक्षित होती तिच्या खूप जवळची आहे. इस्रोच्या कर्नाटकातील मुख्य नियंत्रण केंद्राने (मास्टर कंट्रोल फॅसिलिटी) या उपग्रहाची सूत्रे आणि नियंत्रण हाती घेतले असून त्याने उपग्रहाच्या केलेल्या प्राथमिक तपासणीत त्याचे आरोग्य नियमित असल्याचे स्पष्ट झाले.
उपग्रह जिओ स्टेशनरी भ्रमणकक्षेत (विषुववृत्ताच्या वर ३६ हजार किलोमीटरवर) ठेवण्यासाठी येत्या दिवसांत भ्रमणकक्षा वाढविण्याचे योजनाबद्ध प्रयत्न केले जातील. (वृत्तसंस्था)

Web Title: Successful launch of India's new telecommunications satellite

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.