नवी दिल्ली - जमिनीवरून हवेत तत्काळ मारा करण्यात सक्षम असलेल्या क्षेपणास्त्राची आज डीआरडीओने यशस्वी चाचणी घेतली. ओडिशामधील समुद्र किनाऱ्याजवळून या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली.
चाचणीवेळी जमिनीवरून हवेत मारा करण्यासाठी सक्षम असलेल्या या क्षेपणास्त्राने यशस्वीपणे लक्ष्यभेद केला. दरम्यान, या क्षेपणास्त्राची झालेली यशस्वी चाचणी हे इस्रोसाठी मोठे यश मानले जात आहे.