- खुशालचंद बाहेती नवी दिल्ली : जगभरात दरवर्षी ८ लक्ष लोक आत्महत्या करून आपले जीवन संपवतात. दर ४० सेकंदाला एक जण आत्महत्या करतो. राष्ट्रीय गुन्हे अभिलेख विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशात २०१९ मध्ये १ लक्ष ३९ हजार १२३ लोकांनी आत्महत्या केली. आत्महत्यांच्या प्रमाणात आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्यांची संख्या तब्बल ४० पट जास्त असते, असे एका अभ्यासात आढळून आले आहे. यावरून आत्महत्या व त्याचा प्रयत्न या प्रश्नाचे गांभीर्य अधिकच वाढते.
देशातील आत्महत्येमध्ये महाराष्ट्राचा क्रमांक सर्वात वरचा आहे. एकूण आत्महत्येच्या १३.६% आत्महत्या एकट्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. कौटुंबिक कलह हे आत्महत्येमागचे प्रमुख कारण असल्याचेही स्पष्ट झाले आहे. २०१९ मध्ये आत्महत्या करणाऱ्यांत गृहिणींची संख्या १५.४ % आहे.
विवाहितांची आत्महत्या९२,७५७ (६६.७%)
अविवाहितांची आत्महत्या३२,८५२ (२३.६%)
दि. १० सप्टेंबर २०१३ पासून प्रतिवर्ष
देशातील ५३ (१० लक्षापेक्षा जास्त लोकसंख्या) महानगरात झालेल्या आत्महत्येपैकी मुंबई, दिल्ली, चेन्नई, बंगळुरूमध्ये ३६.६% आत्महत्या.