मतदान ओळखपत्रावर तुम्ही नाव आणि जन्मतारीख चुकीची असल्याचे प्रकरण अनेकदा समोर आले आहे. मात्र मतदान ओळखपत्रावर एखादा मतदाराच्या फोटोच्या जागी कुत्राचा फोटो असल्याचे पहिल्यांदाच ऐकले असेल. पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबादमध्ये एका स्थानिक नागरिकाला निवडणूक आयोगाने चक्क कुत्र्याचा फोटो असलेले मतदान ओळखपत्र दिल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.
सुनील कर्माकर यांनी आपल्यास मतदान ओळखपत्रात काही बदल करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे अर्ज केला होता. मात्र काही दिवसांनंतर जेव्हा सुनील कर्माकर यांनी मतदान ओळखपत्र मिळाले तेव्हा ओळखपत्रावर त्यांच्या फोटोच्या जागी कुत्र्याच्या फोटो होता. यानंतर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी न तपासता ओळखपत्र दिल्यामुळं बीडीओ कार्यालयाने सुनील कर्माकर यांची माफी मागितली आहे.
निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, आमची चूक झाली असून ती लवकरच दुरुस्त केली जाईल. तसेच मतदान ओळखपत्रातील सुधारणेसाठी ज्याने ऑनलाइन अर्ज भरला त्याच्याकडून फोटोत बदल झाला आहे असं निवडणूक अधिकाऱ्याने यावेळी सांगितले. दरम्यान या मतदान ओळखपत्राचा फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.