सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनही त्रस्त, आज तातडीची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 01:35 AM2018-01-13T01:35:42+5:302018-01-13T01:35:56+5:30
चार वरिष्ठ न्यायाधीशांनी जी विधाने केली, त्यावर सर्वोच न्यायालयात दिवसभर चर्चा होती. झाल्या प्रकाराने सारेच जण गोंधळून गेले होते. या प्रकाराने सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनही त्रस्त झाली आहे.
Next
- नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : चार वरिष्ठ न्यायाधीशांनी जी विधाने केली, त्यावर सर्वोच न्यायालयात दिवसभर चर्चा होती. झाल्या प्रकाराने सारेच जण गोंधळून गेले होते. या प्रकाराने सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनही त्रस्त झाली आहे. यावर चर्चा करण्यासाठी असोसिएशनने शनिवारी बैठक बोलाविली आहे. संघटनेचे सचिव विक्रांत यादव म्हणाले की, न्यायाधीशांनी तक्रार सार्वजनिकपणे मांडायला नको होती. त्यांनी अन्य पर्याय अवलंबिण्याची गरज होती, असे असोसिएशनच्या काही पदाधिका-यांनी बोलून दाखवले.