Sushma Swaraj Death: फॉरेन पॉलिसी मॅगेझीनच्या ग्लोबल थिंकर्सच्या यादीत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2019 04:03 AM2019-08-07T04:03:41+5:302019-08-07T04:03:54+5:30
ट्विटटर या माध्यमाचा लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी अतिशय उत्तमपणे वापर केल्याबद्दल २०१६ च्या ग्लोबल थिंकर्सच्या यादीत घेतले होते.
आंतरराष्ट्रीय राजकारणावर आधारित फॉरेन पॉलिसी या मॅगेझीनने तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे नाव ट्विटटर या माध्यमाचा लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी अतिशय उत्तमपणे वापर केल्याबद्दल २०१६ च्या ग्लोबल थिंकर्सच्या यादीत घेतले होते. डिसिजन मेकर्सच्या श्रेणीत स्वराज यांचे नाव समाविष्ट करण्यात आले होते.
मॅगेझीनने लिहिले होते की, परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी सौदी अरेबियातील १० हजार भारतीय मजुरांच्या उपासमारीची समस्या ट्विटरवर मांडली होती. यानंतर सोशल मीडियावर मोठे आंदोलन उभे राहिले. स्वराज यांनी कामगारांची स्थिती, भारतीय दूतावासाकडून त्यांना दिली जाणारी खाण्यापिण्याची मदत, त्यांचे वेतन आणि त्यांना भारतात आणून सोडण्याबाबतच्या अनेक समस्यांची माहिती ट्विटरच्या माध्यमातून दिली होती. यामुळेच हे कामगार सुखरुपणे मायदेशी परतू शकले होते. हे पहिल्यांदाच घडलेले नव्हते.
येमेनमध्ये अडकलेल्या भारतीयांची सुटका करण्यासाठी सुद्धा सुषमा स्वराज यांनी याचप्रकारे सोशल मीडियाच्या माध्यमातून मदत केली होती. ट्विटरवर खूप सक्रिय असलेल्या सुषमा स्वराज यांना या मॅगझीनने ‘दी कॉमन ट्विटपल्स लीडर’ असे टोपणनावही दिले होते. मॅगझीनमध्ये त्यांचे नाव आल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांचे आभार मानले होते. आमच्या मेहनती परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे नाव ग्लोबल थिंकर्सच्या यादीत सामील झाले आहे.