आंध्र प्रदेशच्या राज्यपाल झाल्याच्या वृत्ताचं सुषमा स्वराजांकडून खंडन, म्हणाल्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2019 09:46 AM2019-06-11T09:46:03+5:302019-06-11T09:46:14+5:30
डॉ. हर्षवर्धन यांच्या ट्विटनंतर तासाभरानं सुषमा स्वराज यांनी ट्विट करत या वृत्ताचं खंडन केलं.
नवी दिल्ली: माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्याचं ट्विट केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं होतं. डॉ. हर्षवर्धन यांच्या ट्विटनंतर तासाभरानं सुषमा स्वराज यांनी ट्विट करत या वृत्ताचं खंडन केलं. आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदी माजी नियुक्ती झाल्याचं वृत्त खोटं आहे, असं सुषमा स्वराज ट्विट करत म्हणाल्या आहेत.
हर्षवर्धन यांनी त्यांच्या ट्विटमध्ये राज्यपाल झाल्याबद्दल स्वराज यांचं अभिनंदन केलं होतं. मात्र थोड्याच वेळात त्यांनी ट्विट डिलीट केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं.
स्वराज या मोदी सरकार 1मध्ये परराष्ट्र मंत्री होत्या. मात्र त्यांना मोदी सरकार 2 मध्ये मंत्रिपद देण्यात आलेलं नाही. 'भाजपाच्या वरिष्ठ नेत्या आणि माझ्या ताई, माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांची आंध्र प्रदेशच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्याबद्दल खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. सर्वच क्षेत्रात तुम्हाला असलेल्या अनुभवाचा जनतेला फायदा होईल,' असं हर्षवर्धन यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.
The news about my appointment as Governor of Andhra Pradesh is not true.
— Sushma Swaraj (@SushmaSwaraj) June 10, 2019
स्वराज यांच्या नियुक्तीची कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नसताना हर्षवर्धन यांनी हे ट्विट केलं होतं. सध्या ईसीएल नरसिम्हन आंध्र प्रदेशचे राज्यपाल आहेत. त्यांच्याकडे तेलंगणाचीदेखील जबाबदारी आहे.
Union Minister Dr Harsh Vardhan has deleted his tweet in which he congratulated senior BJP leader & former External Affairs Minister, Sushma Swaraj on being appointed as the Governor of Andhra Pradesh. https://t.co/ozimnqe1fE
— ANI (@ANI) June 10, 2019