जैसलमेरमधून पाकिस्तानमध्ये व्हिडीओ कॉल करणाऱ्या संशयिताला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2019 01:09 PM2019-03-10T13:09:36+5:302019-03-10T15:41:39+5:30
राजस्थानच्या जैसलमेरमध्ये पोलिसांनी एका संशयित व्यक्तीला अटक केली आहे. तसेच या संशयित व्यक्तीने मोबाईलवरून पाकिस्तानमध्ये व्हिडीओ कॉल केल्याची माहिती समोर आली आहे.
जैसलमेर - पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. यानंतर संतापलेल्या पाकिस्तानने भारताविरोधात जम्मू-काश्मीरमध्ये कारवाया करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे दोन्ही देशात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. राजस्थानच्या जैसलमेरमध्ये पोलिसांनी एका संशयित व्यक्तीला अटक केली आहे. तसेच या संशयित व्यक्तीने मोबाईलवरून पाकिस्तानमध्ये व्हिडीओ कॉल केल्याची माहिती समोर आली आहे. जैसलमेर येथील सैन्य तळाच्या आसपास ही व्यक्ती फिरत असताना त्याला पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जैसलमेर येथील सोनू या गावाजवळ सैन्याचं प्रशिक्षण केंद्र आहे. याठिकाणी एक व्यक्ती फिरताना दिसली. त्याच्या हालचालीवरून पोलिसांना थोडा संशय आला. तसेच त्या व्यक्तीने आपली गाडी उभी करून एक व्हिडीओ कॉल करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यावेळी काही लोकांनी त्याला पकडले. पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने आपलं नाव फतन खान (35) असल्याची माहिती दिली. तसेच सियालो येथील रहिवासी असल्याचं सांगितलं.
KS Dhillon, SHO Ramgarh on suspicious man caught near Army camp in Jaisalmer: Kadar Khan, was brought to police station after he was found roaming near their campus. He has confessed that he went to Pakistan in 2018. Officials have been informed. He's being questioned. #Rajasthanpic.twitter.com/Mf3okEJcun
— ANI (@ANI) March 9, 2019
पोलिसांनी संशयित व्यक्तीला अटक केली असून त्याची कसून चौकशी केली. तसेच त्याच्याकडून एक पेन ड्राईव्ह, कार्ड रिडर आणि एक स्मार्टफोन जप्त करण्यात आला. आपले नातेवाईक पाकिस्तानात राहत असून आपण त्यांना व्हिडीओ कॉल करत असल्याची माहिती फतन खानने दिली. तसेच पोलिसांनी त्याचा स्मार्टफोन चेक केला असता 23 फेब्रुवारीला पाकिस्तानात व्हिडीओ कॉल केल्याचं निष्पन्न झालं. फतनने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्याचे काही नातेवाईक उमरकोट येथील रहिवासी आहेत. त्यामुळे तो पाकिस्तानात जात असतो. गेल्या दोन आठवड्यात 8 संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
जम्मूतील ग्रेनेड हल्ल्यामागे हिज्बुल मुजाहिद्दीनचा हात, एकाला अटक
जम्मू येथील बस स्टँडवर गुरुवारी ग्रेनेड हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात यात एक नागरिकाचा मृत्यू झाला असून 32 जण जखमी झाले आहेत. दरम्यान, हा ग्रेनेड हल्ला करण्यामागे हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली. ग्रेनेड हल्ल्याप्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली. फारूख अहमद भट उर्फ ओमर असे या अटक करण्यात व्यक्तीचे नाव आहे. कुलगाममधील हिजबुल मुजाहिद्दीनचा जिल्हा कमांडर फारूक अहमद भट्ट याने यासीरला ग्रेनेड हल्ला करण्यास सांगितले होते, अशी माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांनी दिली.
देवबंदमधून 'जैश-ए-मोहम्मद'च्या संशयित दहशतवाद्यांना अटक
जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशातील सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत. ठिकठिकाणी सुरक्षा व्यवस्था चोख करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर,उत्तर प्रदेश एटीएसनं देवबंदमधून जैश-ए-मोहम्मदच्या संशयित दहशतवाद्यांना अटक केली. शाहनवाज अहमद तेली आणि आकिब अहमद मलिक अशी अटक केलेल्या दहशतवाद्यांची नावे आहेत. हे दोघंही काश्मीरच्या कुलगाममधील रहिवासी आहेत.