नवी दिल्ली : बॉलिवूडची अभिनेत्री स्वरा भास्करने गेल्या काही दिवसांपासून सोशल मिडियावर भाजपाविरोधात जोरदार आघाडी उघडली होती. मात्र, भाजपाच्या क्लीन स्वीपनंतर ती सोशल मिडियावर जबरदस्त ट्रोल झाली आहे. या स्वरा भास्करने आघाडीच्या काही उमेदवारांसाठी प्रचार केला होता. या उमेदवारांचे काय झाले, हा चर्चेचा विषय बनला आहे.
स्वरा भास्करने काँग्रेस आणि मित्रपक्षांच्या काही उमेदवारांचा उघडपणे प्रचार केला होता. हे सर्व उमेदवार आज हरण्याच्या स्थितीत आहेत. यामध्ये कन्हैया कुमार, दिग्विजय सिंह यांचा समावेश आहे. स्वराने या नेत्यांच्या अनेक रॅलींमध्ये सहभाग घेतला होता.
या उमेदवारांचा पराभव जवळपास निश्चित झाला आहे. बेगुसरायमधून कन्हैयाकुमार हा डाव्या पक्षांचा तरुण चेहरा बनून पुढे आला होता. तर काँग्रेसचे उमेदवार दिग्विजय सिंह हे भोपाळमधून विडणूक लढवत होते. तिसरी उमेदवार आपची आतिशी मारलेना ही माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरविरोधात लढत होती. मात्र, आतिशीचाही पराभव झाला आहे. याशिवाय आपचे आणखी एक उमेदवार राघव चड्ढा यांचाही स्वरा भास्करने प्रचार केला होता.