नवी दिल्ली: काँग्रेस नेते शशी थरुर(Shashi Tharoor) यांनी मंगळवारी एक धक्कादायक दावा केला आहे. 'तालिबान्यांनी त्यांच्या सैन्यामध्ये कमीत-कमी दोन मल्याळम नागरिकांची भरती केली आहे', असा दावा त्यांनी केला आहे. याबाबत त्यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवर एका व्हिडिओही शेअर केला आहे.
शशी थरुर यांनी ज्या व्हिडिओला कोट केलंय, त्यात दोन तालिबानी दिसत आहेत. थरुर यांच्या दाव्यानुसार, ते दोघे मल्याळम भाषेत बोलत आहेत. या आठ सेकंदाच्या व्हिडिओत 'समसारीकेत्ते' म्हणत आहेत आणि दुसरा तालिबान्याला तो शब्द कळतोय.
अफगाणिस्तानवर तालिबानचा ताबाअमेरिकन सैन्य परत गेल्यानंतर तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर ताबा मिळवण्यास सुरुवात केली होती. रविवारी त्यांनी राजधानी काबूलवरही ताबा मिळवला. यानंतर राष्ट्रपती अशरफ गनी यांच्यासह अनेक नेते देश सोडून पळून गेले. आता अफगाणिस्तावर तालिबानची सत्ता स्थापन झालेली आहे.