मातृभाषेतच बोला! उपराष्ट्रपतींचे आवाहन; लोकमत दिल्ली आवृत्तीचा शानदार प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 01:49 AM2017-12-15T01:49:57+5:302017-12-15T01:50:11+5:30

‘जन्म देते ती माता, जिथे जन्म लाभतो ती जन्मभूमी, जिचा वारसा लाभतो ती मातृभूमी, आणि जी मातेच्या गर्भात आपल्या व्यक्तिमत्वाशी जोडली जाते, ती मातृभाषा या चार गोष्टींचा सन्मान हेच कोणाही व्यक्तीचे सर्वोच्च जीवनमूल्य असायला हवे.

Talk in the mother tongue! Vice President appeals; The spectacular start of Lokmat Delhi version | मातृभाषेतच बोला! उपराष्ट्रपतींचे आवाहन; लोकमत दिल्ली आवृत्तीचा शानदार प्रारंभ

मातृभाषेतच बोला! उपराष्ट्रपतींचे आवाहन; लोकमत दिल्ली आवृत्तीचा शानदार प्रारंभ

Next

नवी दिल्ली : ‘जन्म देते ती माता, जिथे जन्म लाभतो ती जन्मभूमी, जिचा वारसा लाभतो ती मातृभूमी, आणि जी मातेच्या गर्भात आपल्या व्यक्तिमत्वाशी जोडली जाते, ती मातृभाषा या चार गोष्टींचा सन्मान हेच कोणाही व्यक्तीचे सर्वोच्च जीवनमूल्य असायला हवे. परभाषा जरूर शिकाव्यात, त्यांचा आदर करावा, पण प्रत्येकाने आपल्या घरी मातृभाषेतच बोलले पाहिजे’ असे ठामपणे सांगत भारताचे उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी ‘लोकमत’च्या दिल्ली आवृत्तीच्या शुभारंभाला प्रादेशिक भाषांच्या अस्मितेची धार दिली आणि लोकमत समूहाचा उत्तरेकडील दिग्विजयी प्रवास समारंभपूर्वक सुरू झाला.
ब्रिटिशांच्या काळात इंग्रजीच्या उदात्तीकरणामुळे प्रादेशिक भाषांच्या अभिमानाचा कणा मोडला, हे आपले दुर्दैव असल्याचे सांगून उपराष्ट्रपतींनी प्रादेशिक माध्यमांनी देशाच्या कानाकोपºयातल्या उपेक्षित समूहांचा आवाज दिल्लीतील सत्ताधीशांच्या कानापर्यंत तातडीने पोहोचवला पाहिजे, अशी अपेक्षाही व्यक्त केली. माध्यमांवर नियंत्रणे आणण्याचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष प्रयत्न अत्यंत निंद्य आहेत. आपल्या भूमिकेबद्दल स्पष्टता असलेल्या माध्यमांनी कोणी आपल्यावर नियंत्रण आणेल, याची वाट न पहाता स्वत:च स्वत:वर नियंत्रण ठेवायला हवे अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
मराठी सरदार यमुनेचे पात्र ओलांडून पार उत्तर टोकापर्यंत दौडले, पण मराठ्यांना दिल्लीवर साम्राज्य प्रस्थापित करणे साधले नाही, हा इतिहास (व वर्तमानही) पुसून देशाच्या राजधानीत दमदार पाऊल टाकणाºया लोकमत वृत्तपत्र समूहाने देशाच्या राजधानीत मराठीचा जरीपटका मानाने रोवला. महाराष्ट्र आणि गोव्याच्या हृदयात खोलवर रुजलेल्या मुळांचा वारसा कृतज्ञतेने स्मरत वयाच्या शंभरीत पाऊल ठेवणाºया लोकमतच्या दिल्ली आवृत्तीचा शुभारंभ सोहळा गुरुवार, १४ डिसेंबर रोजी सायंकाळी उत्साहात संपन्न झाला. समारंभाला उपस्थितांचे लोकमतचे एडिटर इन चिफ राजेंद्र दर्डा यांनी आभार मानले.

दिग्गजांची उपस्थिती!
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंह, राज्यसभा उपसभापती पी.जे. कुरियन, केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी, केंद्रीय पोलादमंत्री चौधरी विरेंद्रसिंह चौधरी, माहिती व तंत्रज्ञान मंत्री रवीशंकर प्रसाद, मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, लोकमत मीडिया लि.चे अध्यक्ष विजय दर्डा, लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांच्यासह लोकप्रतिनिधी, सनदी अधिकारी, विविध देशांच्या वकिलातींचे प्रतिनिधी, ज्येष्ठ उद्योगपती व महाराष्टÑाची सरहद्द ओलांडून यमुनेतीरी संसार थाटलेल्या मराठी कुटुंबांच्या नव्या-जुन्या पिढ्यांचे अनेक प्रतिनिधी उत्साहाने सहभागी झाले होते.

नागपूर ते दिल्ली हा लोकमतचा प्रवास अभिमानास्पद - नितीन गडकरी
देशाचे ह्रदय असलेल्या दिल्लीतून लोकमत आपली सुरुवात करत आहे, याचा आनंद आहे. आता महाराष्ट्राच्या बातम्या दिल्लीत वाचायला मिळतील, असे सांगून केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी म्हणाले, शेतकºयांच्या समस्या असो की बेरोजगारी, लोकमतने नेहमीच संवेदनशील विषयांना हात घातला आहे. त्यामुळे लोकमत मराठी अस्मितेचे प्रतीक बनला आहे.
लोकमतच्या यवतमाळापासूनच्या प्रवासाचे आपण साक्षीदार आहोत. नागपूरकर म्हणून हा प्रवास अभिमानास्पद वाटतो, असे सांगत गडकरींनी लोकमतसोबतचे ऋणानुबंध व्यक्त केले. दिल्लीमध्ये लोकमत महत्त्वाची भूमिका यशस्वीपणे पार पाडेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

तो हम भी बागी है...!
वाचक हा वर्तमानपत्राचा मालक आहे असे स्व. जवाहरलाल दर्डा म्हणत असत. त्यांच्याच विचाराने आम्ही पुढे जात आहोत. आमचे शब्द धारदारच असतील. त्यांना सत्याचा ध्यास कायम राहील, अशी ग्वाही देताना लोकमत मिडीयाचे अध्यक्ष विजय दर्डा म्हणाले,
सच कहना बगावत है, तो समझीऐ हम भी बागी है...!

लोकमतचे दिल्लीत स्वागत असो - केजरीवाल
मुख्यमंत्री या नात्याने लोकमतचे मी दिल्लीत मनापासून स्वागत करतो, असे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणाले. माध्यमांची तटस्थ भूमिका घ्यायला हवी. आजच्या काळात ते अधिक आवश्यक आहे. लोकमतने महाराष्टÑ व गोवा गाजवला. आता ते दिल्ली काबीज करण्यासाठी आले आहेत. लोकमतने राजधानीत मराठी लोकांना एकत्र करुन त्यांचा दिल्लीतील आवाज बुलंद करावा, मुख्यमंत्री म्हणून लागेल ती मदत करेन, असे आश्वासनही केजरीवाल यांनी दिले.

वृत्तपत्र ही जगाचा नजारा दाखविणारी मोठी विलोभनीय खिडकी आहे. त्यातून जे दिसते त्याचे मूल्य लाखमोलाच्या हिरेमाणकांपेक्षाही मोठे असते. एखाद्या राष्टÑाने स्वत:शी केलेला संवाद म्हणजे वृत्तपत्र ही भावना लोकमतच्या प्रवासात अक्षय राहील, याचा मला विश्वास आहे.
- अमिताभ बच्चन (शुभेच्छा संदेशातून)

Web Title: Talk in the mother tongue! Vice President appeals; The spectacular start of Lokmat Delhi version

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.