तामिळनाडूत कॉपर प्लांटला मद्रास हायकोर्टाची स्थगिती, आतापर्यंत 11 जणांचा गेला जीव
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2018 12:43 PM2018-05-23T12:43:49+5:302018-05-23T12:43:49+5:30
तामिळनाडूच्या तुतिकोरिन या किनारी जिल्ह्यात वेदान्त उद्योग समूहातील स्टरलाइट कंपनीतर्फे उभारण्यात येत असलेल्या कॉपर प्लांटच्या बांधकामाला मद्रास उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे.
मदुराई- तामिळनाडूच्या तुतिकोरिन या किनारी जिल्ह्यात वेदान्त उद्योग समूहातील स्टरलाइट कंपनीतर्फे उभारण्यात येत असलेल्या कॉपर प्लांटच्या बांधकामाला मद्रास उच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. या कॉपर प्लांटच्या विरोधात हजारो स्थानिकांनी निदर्शनं केली आहेत. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात जवळपास 11 लोकांचा मृत्यू झाला असून, केंद्रीय गृहमंत्रालयानं यासंदर्भात तामिळनाडू सरकारकडून अहवाल मागवला आहे.
Retired Judge Aruna Jagadeesan has been appointed by the #TamilNadu government to probe police firing during anti-sterlite protest in #Thoothukudi that claimed 11 lives
— ANI (@ANI) May 23, 2018
गोळीबाराचं वृत्त पोलिसांनी फेटाळलं असून, मात्र मुख्यमंत्री पलानीस्वामी यांनी पोलीस गोळीबारात निदर्शक मृत्युमुखी पडल्याची माहिती दिली आहे. या प्रकरणाची चौकशी माजी न्यायाधीशांमार्फत करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. तसेच मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाख, तर जखमींना 3 लाखांची मदत जाहीर केली. या प्रकारामुळे द्रमुकचे नेते एम. के. स्टॅलिन यांनी कुमारस्वामी यांच्या शपथविधीला न जाण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पामुळे हवा व पाण्याचे अतोनात प्रदूषण होते, असा स्थानिकांचा व स्वयंसेवी संस्थांचा आरोप आहे.
DMK calls for an all party protest on May 25 over the matter where 11 people were killed in police firing during protests against Sterlite industries yesterday. #TamilNadupic.twitter.com/AOfgF04TyS
— ANI (@ANI) May 23, 2018
#Madurai bench of Madras High Court stays construction of a new copper smelter by #Sterlite industries in #Thoothukudipic.twitter.com/K4TZpffArv
— ANI (@ANI) May 23, 2018
Home Ministry seeks a report from Tamil Nadu govt over #Thoothukudi incident where 11 people were killed yesterday in police firing during protests against Sterlite industries. pic.twitter.com/MjSK2tzHYR
— ANI (@ANI) May 23, 2018
प्रचंड बंदोबस्त
मुख्यमंत्री एडापडी पलानीस्वामी यांनी तेथील जनतेला शांततेचे आवाहन केले तर द्रमुक नेते एम. के. स्टॅलिन यांनी पोलिसी अत्याचारांचा निषेध केला. तुतिकोरिनमध्ये आता 2 हजार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.