सर्वांना मोफत कोरोना लस! निवडणुकीआधी "या" सरकारने केली मोठी घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2021 04:13 PM2021-02-05T16:13:25+5:302021-02-05T16:33:43+5:30
Corona Vaccine : कोरोनाच्या मोफत लसीसोबतच राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठी भेट दिली.
नवी दिल्ली - तामिळनाडूमध्ये (Tamilnadu) कोरोना लसीसंदर्भात (COVID-19 vaccine) एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एडप्पादी के. पलानीस्वामी यांनी सर्वांना मोफत कोरोना लस देण्याची घोषणा केली आहे. शुक्रवारी विधानसभेच्या अधिवेशनाला संबोधित करताना पलानीस्वामी यांनी "आम्ही पूर्वी जाहीर केल्यानुसार सर्वांना कोरोना लस मोफत देऊ आणि तामिळनाडूला कोरोना व्हायरसपासून मुक्त करू" असं म्हटलं आहे.
मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर सत्ताधारी पक्षाचे आमदार एम. सेम्मलाई यांनी कोरोनाची लस राज्यातील सर्वसामान्यांना आणि आमदारांना मिळण्यासाठी किती वेळ लागेल असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना आरोग्यमंत्री सी विजयभास्कर यांनी कोरोनाच्या संकटात अग्रस्थानी काम करणाऱ्या 1,33,000 आरोग्य कर्मचार्यांना कोरोनाची लसी देण्यात आली आहे. यानंतर कोरोनाच्या लसीकरणासाठी पोलीस, महसूल कर्मचार्यांसह साडे आठ लाखांहून अधिक लोकांचा विचार सुरू आहे.
We will give free #COVID19 vaccine to all, as announced earlier and will make Tamil Nadu free of Coronavirus: CM Edappadi Palaniswami in State Legislative Assembly https://t.co/bZMZX4T7Igpic.twitter.com/F6fnh7yU2W
— ANI (@ANI) February 5, 2021
कर्ज घेतलेल्या 16.43 लाख शेतकऱ्यांचा होणार फायदा
कोरोनाच्या मोफत लसीसोबतच राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठी भेट दिली. तामिळनाडू सरकारने विधानसभेत 12,110 कोटी रुपयांची कर्जमाफी जाहीर केली आहे. सहकारी बँकांकडून कर्ज घेतलेल्या 16.43 लाख शेतकर्यांना याचा फायदा होणार आहे. मुख्यमंत्र्यांनी "राज्यात चक्रीवादळ वादळ, खराब हवामान आणि मुसळधार पावसाचा शेतीवर परिणाम होतो. तसेच त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो. त्यामुळे कर्जमाफीचा निर्णय घेण्यात आला" असल्याचं म्हटलं आहे.
CoronaVirus News : कोरोनाच्या संकटात मोठा दिलासाhttps://t.co/SlETuDFsM7#CoronaVirusUpdates#Corona#CoronaVaccine
— Lokmat (@MiLOKMAT) February 4, 2021
आशेचा किरण! "या" लसीची कमाल, पहिल्या डोसनंतर कोरोनाच्या संसर्गात 67 टक्क्यांनी घट, रिसर्चमधून दावा
कोरोनामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झालेली असतानाच लसीबाबत एक दिलासादायक माहिती आता समोर आली आहे. कोरोना व्हायरसच्या अनेक लसी या शर्यतीत पुढे असून एस्ट्राजेनेका लसीला मोठं यश मिळालं आहे. विद्यापीठ आणि एस्ट्राजेनेका कंपनी यांनी संयुक्तरीत्या तयार केलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस घेतल्यानंतरच कोरोना व्हायरसचा संसर्ग होण्याचं प्रमाण 67 टक्क्यांनी कमी झालं आहे. कोरोनाच्या प्रसारावर निर्बंध आणण्यासाठी ही लस परिणामकारक ठरत आहे, असं ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या रिसर्चमधून स्पष्ट झालं आहे. कोरोनाच्या संकटात लस परिणामकारक ठरत असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. रिसर्चमध्ये लोकसंख्येतील संसर्गग्रस्तांची संख्या कमी करून कोरोनाचा संसर्ग कमी करण्यावर या लसीचा मोठा परिणाम होऊ शकतो असं म्हटलं आहे. तसेच लसीमुळे होणारा फायदाही अधिक आहे.
कोरोना काळातील डॉक्टरांच्या मृत्यूच्या संख्येने नवा वाद, IMAने केली उच्चस्तरीय चौकशीची मागणीhttps://t.co/dmg77ducgu#Corona#CoronaVirusUpdates#coronawarriors#Doctors
— Lokmat (@MiLOKMAT) February 4, 2021