प्रयागराज : उत्तर प्रदेशमध्ये 69000 जागांवरील शिक्षक भरती घोटाळ्याचा भांडाफोड करणाऱ्या प्रयागराजचे वरिष्ठ पोलीस अधिक्षक सत्यार्थ अनिरुद्ध पंकज यांना प्रतिक्षायादीमध्ये टाकण्यात आले आहे. तसेच त्यांच्या जागी आयपीएस अभिषेक दीक्षित यांना नवीन एसएसपी बनविण्यात आली आहे. यामुळे उत्तर प्रदेशमध्येशिक्षक भरतीच्या उमेदवारांनी योगी आदित्यनाथ सरकारवर टीका केली आहे.
सत्यार्थ अनिरुद्ध पंकज यांनी हा मोठा घोटाळा उघड केला होता. प्रयागराजच्या सोराव पोलीस ठाण्यामध्ये एका परिक्षार्थीने तक्रार केल्यानंतर पंकज यांनी एफआयआर दाखल केला होता. 69000 सहाय्यक शिक्षकांच्या भरती प्रक्रियेतील घोटाळ्याची चौकशी पंकज यांनी स्वत:च्या मार्गदर्शनाखाली सुरु केली होती. या तपासाची जबाबदारी त्यांनी दोन धडाडीच्या आयपीएस अधिकाऱ्यांकडे सोपविली होती. या अधिकाऱ्यांनी उत्तर प्रदेशमध्ये कॉपी करणाऱ्या नेटवर्कला उद्ध्वस्त केले होते. अशोक वेंकटेश आणि अनिल यादव असे त्यांचे नाव होते.
या कारवाईमुळे या घोटाळ्यातील आरोपींची धरपकड व्हायला सुरुवात झाली. यामध्ये शिक्षक भरतीमधील दलाल आणि क़ॉपी माफियांची नावे उघड होऊ लागली. तपासाच्या सुरावातीला पंकज यांच्या आदेशावरूनच एका कारमधून पलायन करण्याच्या बेतात असलेल्या 6 संशयितांना साडे सात लाख रुपयांसह ताब्यात घेण्यात आले. याशिवाय अनेक शाळांविरोधात त्यांनी कारवाई सुरु केली. तसेच कॉपी माफिया कृष्ण लाल पटेलह अनेक आरोपींना गजाआड केले. आता पंकज यांच्या बदलीवरून उत्तर प्रदेशमधील वातावरण तापू लागले आहे. त्यांनी शिक्षक भरती घोटाळा उघडकीस आणल्यानेच बदली करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच उत्तर प्रदेश सरकारने त्यांना कोणतेही पद दिलेले नसून त्यांना प्रतिक्षा यादीत ठेवल्याचाही निषेध व्यक्त होत आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या...
संयुक्त महाराष्ट्रासाठी लढलेले ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचं निधन
EPFO ची जबरदस्त सेवा सुरु; देशभरात कोणत्याही क्षेत्रिय कार्यालयात करता येणार क्लेम
खाट का कुरकुरतेय? विधान परिषदेवरून शिवसेनेचा काँग्रेसवर निशाणा
TikTok ची कंपनी भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत?; व्हिडीओ अॅप बंद करणार