काश्मीर - जम्मू काश्मीरमधील दहशतवाद्यांचे क्रुर कृत्य पुन्हा एकदा समोर आलेले आहे. काश्मीरच्या शोपिया, बांदीपोरा आणि सोपोरमध्ये या भागात दहशतवादी आणि जवानांमध्ये अनेक दिवसांपासून चकमकी होत आहेत. जम्मू काश्मीरमध्ये दहशत निर्माण करणाऱ्या दहशतवाद्यांनी शुक्रवारी क्रुर कृत्य केलं. 12 वर्षाच्या मुलाला ओलीस ठेवून दहशतवाद्यांनी त्याची हत्या केली. त्या मुलाच्या आई-वडिलांनी आर्त विनवणी करत आपल्या मुलाची सुटका करावी अशी हात दहशतवाद्यांना देत होते. मात्र आई-वडिलांच्या विनवणीनंतरही दहशतवाद्यांच्या हृदयाला पाझर फुटला नाही. अखेर त्या मुलाची दहशतवाद्यांनी हत्या केली.
शुक्रवारी झालेल्या दहशतवादी आणि भारतीय जवानांच्या चकमकीत सुरक्षा यंत्रणांनी सडेतोड उत्तर देत 7 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जम्मू काश्मीरमधील तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या चकमकीत गेल्या 24 तासांत 7 दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आले. तर एका 12 वर्षाच्या मुलाची क्रुर हत्या दहशतवाद्यांनी केली आहे. बांदीपोरा जिल्ह्यातील मीर मोहल्ला येथे 2 दहशतवाद्यांना ठार केलं आहे. याच दहशतवाद्यांनी मुलाला ओलीस ठेवले होते. तर आणखी एका ओलीस ठेवलेल्या नागरिकाला सोडविण्यात पोलिसांना यश आलं. चकमकीत ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या एका कमांडरचाही समावेश आहे. शोपिया जिल्ह्यातील इमाम साहिब भागात दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे.
मुलाला सोडविण्यासाठी आई-वडिल दहशतवाद्यांकडे अक्षरश:भीक मागत होते. मात्र दहशतवाद्यांना आई-वडिलांच्या याचनेमुळे जराही दया आली नाही. “आमच्या मुलाला सोडून द्या, हा जिहाद नव्हे तर मुर्खपणा आहे अशी आई वडिलांनी विनवणी करूनही निर्दयी दहशतवद्यांनी ऐकले नाही आणि त्या लहान मुलाचा जीव घेतला.
उत्तर काश्मीरच्या सोपोरमध्ये दोन दिवसांपूर्वी रफियाबाद याठिकाणी दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला होता. सुरक्षा यंत्रणाचे या परिसरात शोधमोहीम सुरु असताना दहशतवाद्यांकडून हा हल्ला करण्यात आला होता. या ग्रेनेड हल्ल्यात कोणतीही जिवीतहानी हानी झाली नव्हती मात्र 3 पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. या हल्ल्यानंतर संपूर्ण परिसरात सुरक्षा यंत्रणा वाढविण्यात आली आहे. मागील 4 दिवसांपासून या परिसरात सुरक्षा यंत्रणांची शोधमोहीम सुरु आहे. दहशतवादी आणि सुरक्षा यंत्रणांमध्ये चकमकी सुरु आहे