ठरलं ! तुमच्या मुलांच्या दफ्तराचं वजन निश्चित, सरकारचं नवं धोरण जाहीर

By महेश गलांडे | Published: December 9, 2020 01:55 PM2020-12-09T13:55:24+5:302020-12-09T13:56:09+5:30

सरकारच्या नवीन धोरणानुसार पहिलीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याच्या बॅगचे वजन 1.6 ते 2.2 किलो ग्रॅमपेक्षा जास्त नसावे. तर, बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कॉलेज बॅगचे वजन 3.5 ते 5 किलो एवढेच असणार आहे.

That's it! The weight of your child's school bag is fixed, the government announces a new policy | ठरलं ! तुमच्या मुलांच्या दफ्तराचं वजन निश्चित, सरकारचं नवं धोरण जाहीर

ठरलं ! तुमच्या मुलांच्या दफ्तराचं वजन निश्चित, सरकारचं नवं धोरण जाहीर

Next
ठळक मुद्देसरकारच्या नवीन धोरणानुसार पहिलीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याच्या बॅगचे वजन 1.6 ते 2.2 किलो ग्रॅमपेक्षा जास्त नसावे. तर, बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कॉलेज बॅगचे वजन 3.5 ते 5 किलो एवढेच असणार आहे.

नवी दिल्ली - शाळेतील विद्यार्थ्यांच्या दफ्तराच्या वजनावरुन नेहमीच वादविवाद आणि चर्चा घडून आल्या आहेत. विशेष म्हणजे सरकार दरबारीही हा प्रश्न अनेकदा उपस्थित झाला होता. मात्र, आता केंद्र सरकारने या प्रश्नावर कायमचं उत्तर शोधलंय. सरकारने शाळेतील विद्यार्थ्यांसाठी नवीन बॅग पॉलिसी जारी केली आहे. त्यानुसार, शाळेतील मुलांच्या दफ्तराचे वजन त्यांच्या वजनाच्या 10 टक्क्यांपेक्षा जास्त असू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. 

सरकारच्या नवीन धोरणानुसार पहिलीच्या वर्गात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याच्या बॅगचे वजन 1.6 ते 2.2 किलो ग्रॅमपेक्षा जास्त नसावे. तर, बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कॉलेज बॅगचे वजन 3.5 ते 5 किलो एवढेच असणार आहे. विशेष म्हणजे प्री-प्रायमरी वर्गात शिकणाऱ्यांना बॅग फ्री म्हणजे दफ्तराविना शाळा असं धोरण आखण्यात आलं आहे. केंद्र सरकारने नवीन शैक्षणिक वर्षापासून या धोरणाच्या अंमलबजावणीचे आदेश सर्वच राज्य सरकार आणि केंद्र शासित प्रदेशातील शाळ व महाविद्यालयांना दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या बॅगेचं वजन चेक करण्यासाठी शाळांमध्ये वजनकाटा ठेवण्यात येणार आहे. 

पुस्तक प्रकाशकांना पुस्तकाच्या पाठिमागे त्याचे वजनही छापणे बंधनकारक करण्यात आले आहे. पहिलीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना एकूण 3 पाठ्यपुस्तके असणार आहेत, ज्याचे वजन 1078 ग्रॅम असेल. तर, बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना एकूण 6 पुस्तके असणार आहेत. ज्याचे वजन 4182 ग्रॅम एवढे असणार आहे. विद्यार्थ्यांच्या बॅगचे वजन निश्चित करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने एक समितीची नेमणूक केली होती. एका दिर्घकालीन सर्वेक्षणानंतर या समितीने स्कूल बॅगचे वजन निश्चित केलं आहे. दरम्यान, अनेकदा देशातील विविध न्यायालयांनीही विद्यार्थ्यांच्या स्कूल बॅगच्या वजनासंदर्भात मत नोंदवले होते. 

कशाचं वजन किती

स्कूल बॅगमध्ये पुस्तकांचे वजन 500 ग्रॅम ते 3500 ग्रॅम एवढे असणार आहे, तर वह्यांचे वजन 200 ते 2.5 किलो ग्रॅम एवढे असेल. त्यासोबतच, जेवणाच्या डब्ब्याचे आणि पाण्याचे बाटलीचे वजन 200 ग्रॅम ते 1 किलो ग्रॅम एवढेच असणार आहे. एकंदरीत विद्यार्थ्यांच्या शरीराच्या वजनाच्या दहा टक्केच वजन त्यांच्याकडील दफ्तराचे असणार आहे. 
 

Web Title: That's it! The weight of your child's school bag is fixed, the government announces a new policy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.