रात्रीच्या अंधारात प्रेयसीच्या घरी पोहोचला प्रियकर, तिच्या नातेवाईकांनी पकडून केलं धक्कादायक कृत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2024 12:11 PM2024-03-03T12:11:01+5:302024-03-03T12:13:49+5:30
Bihar Crime News: बिहारमध्ये रात्रीच्या अंधारात आपल्या प्रेयसीच्या घरी लपून छपून जाणं तिच्या प्रियकराला चांगलंच महागात पडलं. ही घटना बक्सर जिल्ह्यातील चतुरशाल गंज येथे घडली आहे. येथे प्रेयसीला भेटायला आलेल्या तरुणाला प्रेयसीच्या कुटुंबीयांनी पकडले.
बिहारमध्ये रात्रीच्या अंधारात आपल्या प्रेयसीच्या घरी लपून छपून जाणं तिच्या प्रियकराला चांगलंच महागात पडलं. ही घटना बक्सर जिल्ह्यातील चतुरशाल गंज येथे घडली आहे. येथे प्रेयसीला भेटायला आलेल्या तरुणाला प्रेयसीच्या कुटुंबीयांनी पकडले. तसेच त्याला बेदम मारहाण केली. हे लोक एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी धारदार हत्याराने त्या प्रियकर तरुणाचे गुप्तांग कापून टाकले. या घटनेनंतर तरुणाची प्रकृती गंभीर आहे.
या तरुणाला गंभीर अवस्थेत उपचारांसाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिथे डॉक्टरांकडून त्याच्यावर उपचार केले जात आहेत. पीडित तरुणाचं नाव अनिल गोंड असं असून, तो डुमरांव ठाणे क्षेत्रातील रहिवासी आहे. गंभीर जखमी झालेल्या अनिलचे काका गुड्डू गोड यांनी सांगितले की, त्या तरुणीच्या बोलावण्यावरून अनिल हा तिच्या घरी डुमरांव येथील चतुरशाल गंज येथे गेला होता. तिथे या तरुणीच्या नातेवाईकानी त्याची अशी अवस्था केली. त्यानंतर तरुणीच्या नातेवाईकांनी तो मृत झाला असं समजून त्याला रस्त्याच्या कडेला फेकले होते.
या घटनेनंतर बक्सरचे एसपी मनीष कुमार यांनी प्रकरणाच्या तपासासाठी एक विशेष टीम स्थापन केली आहे. या स्पेशल टीमचं नेतृत्व बक्सर जिल्ह्यातील डुमरांव विभागातील डीएसपी अनीषा राणा करत आहेत. डुमरांव पोलिसांनी जखमी तरुणाचा जबाब नोंदवून घेतला आहे. तसेच या प्रकरणी नातेवाईकांनी पोलिसांकडे न्यायाची मागणी केली आहे. जखमी तरुणावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, धारदार हत्याराने गुप्तांग कापण्यात आले. त्यामुळे तरुणाच्या गुप्तांगाच्या नसांचं नुकसान झालं आहे. त