येणारी २५ वर्षे देशासाठी महत्वाची, आज देव आशीर्वाद देत आहेत; मोदींचे संसदेत भाषण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2024 05:28 PM2024-02-10T17:28:36+5:302024-02-10T18:20:09+5:30
आज राम मंदिरावर आभार प्रस्ताव मांडण्यात आला. यावर मोदींनी भाषण केले. यामध्ये नवीन लोकसभा बांधण्यापासून ते राम मंदिर बांधण्यापर्यंत मोदींनी मुद्दे मांडले.
संसदेत आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा अखेरचा दिवस होता. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १७ व्या लोकसभेत झालेली कामे, योजना आदींचा लेखाजोखा मांडला. आज राम मंदिरावर आभार प्रस्ताव मांडण्यात आला. यावर मोदींनी भाषण केले. यामध्ये नवीन लोकसभा बांधण्यापासून ते राम मंदिर बांधण्यापर्यंत मोदींनी मुद्दे मांडले.
१७ व्या लोकसभेला देव आशिर्वाद देत आहेत. राम मंदिर उभे राहिले. नवीन लोकसभा बांधण्यासाठी सगळेच चर्चा करत होते. अध्यक्ष महोदयांच्या निर्णयक्षमतेमुळे ते शक्य झाले. देशाच्या प्रत्येक कोपऱ्यातून खासदारांना शिव्या पडत असत. त्यांना एवढ्या रुपयांत जेवण मिळते, आम्हाला एवढ्या. अध्यक्षांच्या निर्णयामुळे प्रत्येक खासदार एमपी कॅन्टीनमध्ये बाहेरच्या व्यक्तीएवढेच पैसे देतोय. या खासदारांनी कोरोना काळात आपल्या वेतनातून ३० टक्के वेतन कपात करण्यात निर्णय घेतला, असे मोदी म्हणाले.
देशाची पुढील पीढी आपली न्यायसंहिता पाहिल. दहशतवादाविरोधात कठोर कायदे केले. काश्मीरचा ३७० हटविला. तिहेरी तलाक कायदा महिला शक्तीला मुक्ती देऊन गेला हे सर्व काम १७ व्या लोकसभेने केले आहे. सर्व खासदार ज्यांचे विचार काहीही सांगत असतील परंतु ते कधी ना कधी सांगतील नारी शक्तीला सक्षम केले गेले, असे मोदी म्हणाले.
येणारी २५ वर्षे देशासाठी महत्वाचे आहेत. राजकारण, महत्वाकांक्षा आपल्या जागी, परंतु देशाच्या अपेक्षा आकांक्षा या पूर्ण होत आहेत. हा देश इच्छित परिणाम पूर्ण करणार. महात्मा गांधींनी मीठाचा सत्याग्रह केला. खूप छोटी घटना वाटत होती. घोषणा दिली तेव्हा देशाच्या लोकांना एक शक्ती देऊन गेला. आज देश अशाच वाटेवर आहे, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला. तरुणांसाठी ही पाच वर्षे खूप महत्वाची ठरली आहेत. व्यवस्थेत पारदर्शीपणा आला आहे. ज्या गोष्टी तरुणांना चिंतेत टाकत होत्या त्यावर कठोर कायदे केले आहेत, असे मोदी म्हणाले.