अख्खे जग महागाईने चिंतेत; भारतीयांना मात्र वेगळीच काळजी, नेमकं प्रकरण काय?, पाहा!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2022 12:20 PM2022-11-02T12:20:34+5:302022-11-02T12:21:25+5:30
‘इप्सॉस’ने ऑनलाइन पॅनल सिस्टमच्या माध्यमातून भारतास २९ देशांत हे सर्वेक्षण केले आहे.
नवी दिल्ली : महागाईमुळे जगभरातील जनता हैराण आहे. वाढत्या महागाईची लोकांना प्रचंड चिंता असते. मात्र, भारतीयांना महागाई छळत नाही, असे आढळले आहे. शहरांत राहणाऱ्या भारतीयांना बेरोजगारी आणि भ्रष्टाचार याची अधिक चिंता वाटत असून महागाईच्या बाबतीत त्यांची चिंता कमी झाली आहे, असे जागतिक सल्ला संस्था ‘इप्सॉस’ने केलेल्या एका सर्वेक्षणात आढळून आले आहे.
‘इप्सॉस’ने ऑनलाइन पॅनल सिस्टमच्या माध्यमातून भारतास २९ देशांत हे सर्वेक्षण केले आहे. या सर्वेक्षणात महागाईबाबत चिंता व्यक्त करणाऱ्या देशांच्या यादीत भारत सर्वांत तळाला आहे.
जगात महागाई वाढली
इप्सॉसचा अहवालात म्हटले आहे की, जागतिक पातळीवर महागाई मागील ६ महिन्यांच्या तुलनेत २% वाढली आहे.
याशिवाय जगभरातील लोक गरिबी, सामाजिक असमानता, बेरोजगारी, गुन्हेगारी व हिंसा तसेच भ्रष्टाचार या मुद्यांवरही चिंतित आहेत.