नवी दिल्ली : आम्हाला एनस्क्रिप्शन सुविधेतील आशय उघड करायला सांगितल्यास व्हॉट्सअॅप भारतातून निघून जाईल, असे या कंपनीने दिल्ली उच्च न्यायालयात गुरुवारी सांगितले. दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मनमोहन व न्या. मनमीत प्रीतमसिंग अरोरा यांच्या खंडपीठापुढे व्हॉट्सअॅपची बाजू वकील तेजस कारिया यांनी मांडली.
व्हॉट्सअॅपने न्यायालयाला सांगितले की, आमच्या प्लॅटफॉर्मवर पाठविण्यात आलेला संदेशांचा ते पाठविणाऱ्याला व ज्याला तो संदेश मिळाला ती व्यक्ती यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणालाही माग काढता येणार नाही. संदेश पाठविणाऱ्यांचा खासगीपणा जपला जावा यासाठीच एंड टू एंड एनस्क्रिप्शनची सुविधा व्हॉट्सअॅपने दिली आहे.
आपला खासगीपणा जपला जातो आहे याची खात्री पटल्यानेच लोक या सुविधेचा वापर करत आहेत, असे व्हॉट्सअॅपचे वकील तेजस यांनी न्यायालयाला सांगितले. माहिती तंत्रज्ञान नियमावली २०२१मधील तरतुदींना व्हॉट्सअॅप व तिची पालक कंपनी फेसबुकने (आताची मेटा) न्यायालयात आव्हान दिले आहे