नवी दिल्ली : वर्षभरापूर्वी एका पुस्तकासाठी प्रियांका गांधी यांनी दिलेल्या मुलाखतीवरुन कुजबूज सुरु असताना काँग्रेसने स्पष्ट केले की, नेहरू-गांधी परिवाराला कधीही सत्तेची लालसा नव्हती. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही स्पष्ट केले की, पक्षासाठी लढा देण्यासाठी आणि पक्ष बळकट करण्यासाठी नेतृत्वपदाची गरज नाही.‘इंडिया टुमारो : कन्व्हर्सेशन वुईथ द नेस्ट जनरेशन ऑफ पॉलिटिकल लीडर्स’ या पुस्तकाला प्रियांका गांधी यांनी दिलेल्या मुलाखतीतील काही भाग प्रसारमाध्यमांनी प्रकाशित केल्याने जोरदार चर्चा होत असताना काँग्रेसनेही तेवढ्याच कणखरपणे नेहरू-गांधी परिवार आणि काँग्रेसची तात्त्विक भूमिका स्पष्ट केली आहे. प्रियांका गांधी यांनी वर्षभरापूर्वी १ जुलै २०१९ रोजी ही मुलाखत दिली होती. त्यानंतर बरेच काही बदलले आहे.माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी राहुल गांधी यांच्यासाठी राजीनामा देण्याची तयारी दाखविली होती; परंतु राहुल गांधी यांनी नम्रपणे हे पद नाकारले, असा खुलासा काँग्रेसने बुधवारी केला. वर्षभरापूर्वीची मुलाखत माध्यमांनी प्रकाशित करण्यामागचा डाव आम्ही ओळखून आहोत. तथापि, मोदी-शहा यांच्याकडून भारतीय राजकारणावर होत असलेला खोडसाळ हल्ला आणि त्याविरुद्ध निर्भयपणे लढा देणे, हाच खरा आजचा संदर्भ होय, असे काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी टष्ट्वीट केले आहे.
पक्षासाठी काम करताना नेतृत्वपदाची गरज नाही, राहुल गांधी यांचे प्रतिपादन
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2020 2:43 AM