'नीट'प्रमाणेच इंजिनीअरिंग प्रवेशांसाठी एकच मुख्य परीक्षा घेणार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2019 06:46 AM2019-11-09T06:46:33+5:302019-11-09T06:46:46+5:30
केंद्र सरकारच्या हालचाली
एस. के. गुप्ता
नवी दिल्ली : वैद्यकीय प्रवेशांसाठी देशात एकच नीटची प्रवेश परीक्षा घेतली जाते. त्याचप्रमाणे इंजिनीअरिंगच्या प्रवेशासाठी एकच प्रवेश परीक्षा घेतली जावी, या दिशेने मनुष्यबळ विकास मंत्रालयाने हालचाली सुरु केल्या आहेत. असे झाल्यास विद्यार्थ्यांची अनेक प्रवेश परीक्षांच्या तणावातून सुटका होणार आहे.
केंद्र सरकारने २०१३ मध्ये एकाच परीक्षेबाबत प्रस्ताव सर्व राज्यांना पाठवला होता. त्यावर्षी गुजरातने या परीक्षेच्या आधारे इंजिनीअरिंगचे प्रवेश देणे सुरु केले होते. त्यानंतर महाराष्ट्रानेही अशा प्रकारे प्रवेश देणे सुरु केले. इंग्रजी, हिंदी, गुजराती आणि मराठीत जेईई परीक्षा घेतल्या जाऊ लागल्या. परंतु २०१६ सालापासून ही राज्ये मुख्य जेईई परीक्षेच्या आधारे इंजिनीअरिंगचे प्रवेश देण्यास विरोध करू लागली आहेत. यामुळे विद्यार्थ्यांवर या वेगवेगळ््या परीक्षांसाठी अभ्यासाचा तणाव वाढतो. परीक्षांच्या खासगी कोचिंगसाठीही मोठा खर्च करावा लागतो.