केंद्रीय मंत्रिमंडळाचा तिसरा विस्तार, जाणून घ्या कोणाला मिळाले कोणते खाते
By ऑनलाइन लोकमत | Published: September 3, 2017 04:18 PM2017-09-03T16:18:43+5:302017-09-03T16:22:00+5:30
2019 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अखेर मोदी सरकारचा तिसरा मंत्रिमंडळ विस्तार राष्ट्रपतीभवनात पार पडला. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये 9 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर...
नवी दिल्ली, दि. 3 - 2019 च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अखेर मोदी सरकारचा तिसरा मंत्रिमंडळ विस्तार राष्ट्रपतीभवनात पार पडला. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये 9 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. तर चार राज्यमंत्र्यांना कॅबिनेटपदी बडती देण्यात आली आहे. आज सकाळी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्र्यांचे खातेवाटप जाहीर झाले आहे. विस्तार आणि फेरबदलांच्या निमित्ताने पुन्हा एकदा मोदी-शहा जोडगोळीच्या धक्कातंत्राचा प्रत्यय दिसून आला आहे. सत्यपाल सिंग यांचा अपवाद वगळता मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या ९ नव्या चेहरेही अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का ठरला. देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या संरक्षण खात्याचा कारभार मोदींनी निर्मला सीतारामन यांच्याकडे सोपवला. या पदासाठी निर्मला सितारामन यांनी निवड अनपेक्षित ठरली. सीतारामन या इंदिरा गांधी यांच्यानंतरच्या देशाच्या दुसऱ्या महिला संरक्षण मंत्री ठरल्या आहेत.
सुरेश प्रभूंकडे वाणिज्य, पियुष गोयल यांच्याकडे रेल्वे मंत्रालय, धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे पेट्रोलियम मंत्रालयासोबत कौशल विकास मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तसेच स्मृती इराणींकडे माहिती प्रसारण मंत्रालयासोबत वस्रोद्योग मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याबरोबरच राज्यवर्धन सिंह राठोड यांच्याकडे क्रीडा आणि युवाक-कल्याण खात्याचा स्वतंत्र प्रभार सोपवण्यात आला आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या नितीन गडकरीं यांच्याकडे गंगा आणि जलसंसाधन मंत्रालयाची अतिरिक्त जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जम्बो मंत्रिमंडळात आज फेरबदल करण्यात आला. मंत्रिमंडळातून आज अधिकृतरित्या डच्चू देण्यात आलेल्या सहा मंत्र्यांनी यापूर्वीच स्वखुशीने आपापल्या पदाचे राजीनामे दिले होते. आगामी लोकसभा निवडणूक आणि सरकारची आतापर्यंतची कामगिरी या दोन निकषांच्या पार्श्वभूमीवर आजचा मंत्रिमंडळ विस्तार निर्णायक ठरला. 2019साली होणारी लोकसभा निवडणूक अवघ्या दीड वर्षांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे आज मंत्रिमंडळात स्थान देण्यात आलेल्या मंत्र्यांच्या कामगिरीकडे यापुढील काळात सातत्याने सर्वांचे लक्ष राहील
फेरबदल कॅबिनेट मंत्री
निर्मला सीतारामन - संरक्षणमंत्री
नितीन गडकरी - दळणवळण, शिपिंग, जलसंपदा, नदीविकास, गंगा स्वच्छता
धर्मेंद्र प्रधान - पेट्रोलियम, कौशल्य विकास मंत्रालय
पियुष गोयल - रेल्वे आणि कोळसा मंत्रालय
स्मृती इराणी - माहिती, प्रसारण, वस्त्रोद्योग खातं
मुक्तार अब्बास नक्वी - अल्पसंख्याक मंत्री
उमा भारती - पेयजल आणि स्वच्छता मंत्री
सुरेश प्रभू - वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय
फेरबदल राज्यमंत्री
डॉ.वीरेंद्र कुमार - महिला, बालविकास, अल्पसंख्याक राज्यमंत्री
अनंतकुमार हेगडे - कौशल्य विकास राज्यमंत्री
विजय गोयल - संसदीय कार्य राज्यमंत्री
अश्विनीकुमार चौबे - आरोग्य, कुटुंबकल्याण राज्यमंत्री
अल्फोन्स कन्नथानम - पर्यटन, माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री
महेश शर्मा - पर्यावरण, सांस्कृतिक राज्यमंत्री
सत्यपाल सिंह - मनुष्यबळ विकास राज्यमंत्री
शिवप्रतापसिंह शुक्ल - अर्थ राज्यमंत्री
आर.के. सिंह - ऊर्जा राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार)
गजेंद्र शेखावत - कृषी राज्यमंत्री