मुंबई- स्कॉर्पियन श्रेणीतील तिसरी पाणबुडी 'करंज' चे आज मुंबईच्या माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड येथून जलावतरण करण्यात आलं. याच श्रेणीतील पहिली पाणबुडी आयएनएस 'कलवरी'चं जलावतरण मागील वर्षी १४ डिसेंबर रोजी झालं, तर दुसरी 'खांदेरी' देखील कार्यरत आहे. नौदलाचे चीफ अॅडमिरल सुनील लांबा या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे होते. प्रकल्प 75 अंतर्गत एमडीएलद्वारे बनविल्या गेलेल्या 6 पाणबुड्यापैकी करंज ही एक पाणबुडी आहे. ६ पाणबुड्या देशाच्या नौदलाच्या ताफ्यात दाखल होणार आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असणाऱ्या 'करंज'मुळे भारतीय नौदलाचं सामर्थ्य वाढणार आहे.
करंजची वैशिष्ट्यं
- 'करंज'ही पूर्णपेण स्वदेशी बनावटीची पाणबुडी आहे. मेक इन इंडियाअंतर्गत तयार केलेली ही पाणबुडी आपल्या अत्याधुनिक वैशिष्ट्यांमुळे शत्रूला नेमकं शोधून मारा करू शकते. 'करंज' पाणबुडीची ६७.५ मीटर लांबीचीतर १२.३ मीटर उंचीची आहे. तिच वजन १५६५ टन आहे.
- 'करंज' टॉरपीडो आणि अँटी शिप क्षेपणास्त्रांचा माराही करू शकते. युद्धाच्या वेळी 'करंज' अत्यंत सुरक्षितपणे आणि सहज शत्रूला चकवा देऊन जाऊ शकते.
- या पाणबुडीचा वापर प्रत्येत प्रकारच्या युद्धात, अँटी सबमरीन वॉरफेअर आणि इंटेलिजन्सच्या कामातही केला जाऊ शकतो.
- 'करंज'चं सर्वात मोठं वैशिष्ट्यं असं की ती कोणत्याही रडारच्या टप्प्यात येत नाही. या पाणबुडीतून जमीनीवरही मारा करता येतो.
- या पाणबुडीतला ऑक्सिजन संपत आला तर ऑक्सिजन तयार करण्याची क्षमताही आहे. परिणामी ही पाणबुडी अधिक काळ पाण्याखाली राहू शकते.
- फ्रान्सच्या टेकनिकने करंज तयार केली आहे. फ्रान्सच्या डीसीएनएसने करंज तयार करायला मदत केली आहे.
- पाणबुडीचं डिझाइन अशाप्रकारे केले आहे ज्यामुळे कुठल्याही युद्धात ती नौदलाच्या फायद्याची ठरेल.