ऑनलाइन लोकमत
जम्मू-काश्मीर, दि. 10 - जम्मू-काश्मीरमधील नौगाम सेक्टरमध्ये तिस-या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास भारतीय लष्कराच्या जवानांना यश मिळाले आहे.
जम्मू-काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील नौगाम सेक्टरमधील नियंत्रण रेषेजवळ काल रात्रीपासून दहशतवादी आणि लष्कर यांच्यात चकमक सुरु आहे. नौगाम सेक्टरमध्ये दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न लष्कराच्या जवानांनी हाणून पाडला आहे. आत्तापर्यंत लष्कराच्या जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला असून अद्याप सर्च ऑपरेशन सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.
लष्करी अधिका-यांने दिलेल्या माहितीनुसार, नौगाम सेक्टरमधील नियंत्रण रेषेजवळ काल रात्री काही संशयास्पद हालचाली दिसून आल्या. त्यानंतर लष्कराने सर्च ऑपरेशन हाती घेतले आणि सकाळी दहशतवादी घुसल्याचे समजते. दहशवाद्यांनी केलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर देत लष्कराच्या जवानांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले. त्यानंतर सुद्धा या परिसरात सर्च ऑपरेशन सुरु ठेवले होते. यानंतर दुपारच्या सुमारास तिस-या एका दहशतवाद्याचा खात्मा करण्यात आला.
#Visuals Nowgam (J&K): Three terrorists killed, search operation underway. (Visuals deferred) pic.twitter.com/o8bKG3DW8z— ANI (@ANI_news) July 10, 2017
(जम्मू काश्मीर : दहशतवादी हल्ल्यात 3 जवान जखमी)
(बुरहान वानीला ठार मारल्याला झालं एक वर्ष, काश्मीरमध्ये अनेकठिकाणी संचारबंदी)
(कुरापती पाकिस्तान : गोळीबारात एक जवान शहीद, पत्नीचाही झाला मृत्यू)
दुसरीकडे, दोन दिवसांपूर्वी पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आले होते. नियंत्रण रेषेजवळ पूंछ सेक्टरमध्ये शनिवारी (8 जुलै ) सकाळपासून पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात एक जवान शहीद झाला. तर, सीमेवर सुरू असलेल्या या गोळीबारात जवानाच्या पत्नीचाही मृत्यू झाला आहे. पाकिस्तानच्या या कुरापतींना भारतीय लष्कराच्या जवानांनी जशास तसे चोख प्रत्युत्तर दिले.
काश्मीरमध्ये अनेकठिकाणी संचारबंदी...
बुरहान वानी या दहशतवाद्याला लष्कराने कंठस्नान घातलेल्या घटनेला एक वर्ष पूर्ण झाले. त्यामुळे येथील फुटीरतावाद्यांवर चाप बसवण्यासाठी जम्मू काश्मीरमधील तीन ठिकाणी संचारबंदी जाहीर करण्यात आली आहे. कायदा व सुरक्षा राखण्यासाठी लष्कराचे तसेच निमलष्करी दलाचे जवान जागोजागी तैनात करण्यात आले आहेत. वानीचं मूळगाव असलेल्या पुलवामा जिल्ह्यातील त्रालमध्येही संचारबंदी आहे. काश्मिर खोऱ्यामध्ये शांतता रहावी म्हणून खबरदारी घेण्यात येत असल्याचे लष्कराने स्पष्ट केले आहे.