गेल्या काही दिवसांपासून इस्त्रायल आणि हमासमध्ये युद्ध सुरू आहे. इस्त्रायल हमासवर सातत्याने हल्ले करत आहे. आता वेगवेगळ्या देशातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, इस्रायल-हमास युद्धावर काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी दिलेल्या वक्तव्याने राजकीय खळबळ उडाली आहे. प्रियांका गांधी यांनीही ट्विटरवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यात त्यांनी 'या विनाशाचे समर्थन करणाऱ्या सरकारांना लाज वाटली पाहिजे', असं म्हटले आहे गांधी यांनी अप्रत्यक्षपणे मोदी सरकारवर टीका केली आहे.
बिहारच्या वाढीव आरक्षणाविरोधात एल्गार; गुणरत्न सदावर्तेंचा नीतीश कुमारांना इशारा
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी ट्विटरवर पोस्ट करत लिहिले की, नरसंहाराचे समर्थन करणाऱ्यांच्या सदसद्विवेकबुद्धीला धक्का बसला नाही. गाझामध्ये १० हजारांहून अधिक लोक मारले गेले, त्यापैकी जवळजवळ निम्मे मुले होती. जे निंदनीय आहे. या विनाशाचे समर्थन करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे.
आपल्या पोस्टमध्ये प्रियांका गांधी म्हणाल्या, WHO नुसार दर दहा मिनिटांनी एका मुलाची हत्या होत आहे. ऑक्सिजनअभावी त्याचा मृत्यू होत आहे. तरीही ज्यांनी नरसंहाराचे समर्थन केले त्यांच्या विवेकबुद्धीला धक्का बसला नाही, युद्धविराम नाही, फक्त आणखी बॉम्ब, अधिक हिंसाचार, अधिक हत्या आणि अधिक दुःख, असंही पोस्टमध्ये म्हटले आहे.
गाझामधील हमास संचालित आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, गाझामधील हमासला संपवण्यासाठी इस्रायलने केलेल्या युद्धात ११,००० हून अधिक लोक मारले आहेत. या अहवालात म्हटले आहे की, मृतांमध्ये हजारो महिला आणि लहान मुले आहेत.