रोटावेटरमध्ये अडकून तीन बालकांचा मृत्यू

By admin | Published: November 26, 2015 11:58 PM2015-11-26T23:58:37+5:302015-11-26T23:58:37+5:30

आमोदा खुर्द येथील घटना : ट्रॅक्टरचालक फरार

Three children die in rotavator | रोटावेटरमध्ये अडकून तीन बालकांचा मृत्यू

रोटावेटरमध्ये अडकून तीन बालकांचा मृत्यू

Next
ोदा खुर्द येथील घटना : ट्रॅक्टरचालक फरार
जळगाव: शेतात बांधावर झोपलेल्या बालकांच्या अंगावरून ट्रॅक्टर गेल्याने त्यात मागे रोटोव्हेटरमध्ये अडकून तीन बालकांचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास अमोदा खुर्द (ता.जळगाव) गावाजवळ घडली. अनिता बाग्या उर्फ काहेर्‍या बारेला (वय दीड वर्ष), मुकेश बाग्या उर्फ काहेर्‍या बारेला (वय ७) वर्ष या दोन भावंडांसह फुंदाबाई राजू बारेला (वय ७) सर्व रा.शेंडी आंजन ता.झिरण्या जि.खरगोन (मध्य प्रदेश) अशी मृत बालकांची नावे आहेत तर कैलास नरसिंग बारेला (वय २२) व संजय बाग्या उर्फ काहेर्‍या बारेला (वय ३) हे दोनजण जखमी झाले आहे.
अमादा-भोकर रस्त्याला लागून असलेल्या ज्ञानेश्वर सीताराम सोनवणे (रा.जळगाव) यांच्या शेतात मका काढण्याचे काम सुरू होते. या रस्त्याचे काम सुरू असल्याने कंत्राटदाराच्या मजुराचे मुलेदेखील शेताच्या बांधावर झोपली होती. त्यांच्या अंगावर ताडपत्री पांघरण्यात आली होती. ट्रॅक्टर चालकाने वेगात ताडपत्रीवरून ट्रॅक्टर नेले. त्यात ताडपत्रीसह तिघे मुले ओढलेे गेले. मागे रोटोव्हेटरमध्ये मुले अडकल्याचे लक्षात येताच चालकाने घाबरलेल्या स्थितीत शेजारी निंबाच्या झाडाखाली झोपलेल्या कैलास व संजय यांना धडक दिली.
इन्फो...
बालके रोटोव्हेटरमध्ये फिरतच राहीले
ताडपत्रीसोबत मुलेही ओढले जाऊन त्यात अडकल्याचे लक्षात आल्यानंतर चालकाने ट्रॅक्टर व रोटोव्हेटर सुरूच ठेवून तेथून पळ काढला. त्यामुळे सुरू असलेल्या रोटोव्हेटरमध्ये तिन्ही बालके फिरतच राहिली व त्यांच्या शरीराचा चेंदामेंदा झाला. प्रकार लक्षात आल्यानंतर चालकाने लागलीच ट्रॅॅक्टर बंद केले असते तर दोन बालकांचा जीव वाचला असता असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

Web Title: Three children die in rotavator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.