रेल्वेत चोरलेला ३ कोटींचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2018 01:35 AM2018-05-25T01:35:11+5:302018-05-25T01:35:11+5:30
आरपीएफची कारवाई; ५,२३९ चोऱ्यांचा छडा लावला
नवी दिल्ली : भारतीय रेल्वेच्या मालमत्तेचे रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) सन २०१७-१८ या वर्षात देशभरात झालेल्या ५,२३९ चोºयांचा छडा लावून चोरट्यांनी पळविलेला २.९३ कोटी रुपयांचा माल हस्तगत केला. गेल्या वर्षीच्या तुलनेत चोरीला गेलेला दुप्पट माल परत मिळाला आहे.
रेल्वेडब्यांमधील स्वच्छतागृहात साखळीने बांधून ठेवलेल्या स्टीलचे मग, पंखे, पलंगपोस, ब्लँकेट्स, रेल्वे रुळ, फिशप्लेट्सही चोरांच्या नजरेतून चुकत नाहीत. विकून ज्याचे झटपट पैसे येतील व जे सहजपणे हाताला लागेल अशा रेल्वेच्या कोणत्याही सामानाची चोरी होत असते.
शिवाय रेल्वेच्या आवारात कोणी शिरू नये यासाठी बांधबंदिस्ती नसते. रेल्वेला लागणाºया वस्तूंचे प्रामुख्याने अभियांत्रिकी (रेल्वे रूळ, फिशप्लेट वगैरे), यांत्रिकी (वॉश बेसिन, नळ, आरसे इ.), सिग्नल व दळणवळण (ओव्हरहेड वायर, सौर पॅनेल, रिले व टेलिफोन) आणि विद्युत उपकरणे (पंखे, बॅटºया, इ.) असे वर्गीकरण असते. यापैकी अभियांत्रिकी सामानावर चोरांचा डोळा असतो.
अपुरे मनुष्यबळ
मात्र रेल्वेकडे असलेल्या एवढ्या मोठ्या पसाºयावर लक्ष ठेवण्यासाठी ‘सीआरपीएफ’ची ७४,४५६ पदे मंजूर आहेत. त्यापैकी फक्त ६७ हजार पदे भरलेली आहेत.