मंत्र्याच्या ताफ्यावर अतिरेकी हल्ला, काश्मिरमधील पुलवामा जिल्ह्यातील घटनेत तीन ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 06:49 AM2017-09-22T06:49:14+5:302017-09-22T06:49:29+5:30
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात त्राल येथे बसस्थानकाजवळ राज्याचे वरिष्ठ मंत्री नईम अख्तर यांच्या वाहनांच्या ताफ्यावर अतिरेक्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात तीन जण ठार झाले, तर ३0 जण जखमी झाले.
श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात त्राल येथे बसस्थानकाजवळ राज्याचे वरिष्ठ मंत्री नईम अख्तर यांच्या वाहनांच्या ताफ्यावर अतिरेक्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात तीन जण ठार झाले, तर ३0 जण जखमी झाले. नईम अख्तर यांच्या वाहनांच्या ताफ्यावरच ग्रेनेड फेकण्यात आला. मात्र ते हल्ल्यातून थोडक्यात बचावले. सकाळी ११.४५ वाजता हा हल्ला झाला. जखमींना उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
दुसरीकडे जम्मू-काश्मीरच्या केरन सेक्टरमध्ये नियंत्रणरेषेजवळ पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन करून केलेल्या गोळीबारात शहीद झालेले सैनिक राजेश खत्री (२७) यांना सैन्याच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.