बंगळुरू - आज सकाळी झालेले कंकणाकृती सूर्य ग्रहण देशातील बहुतांश भागातून दिसले. खगोलप्रेमींसोबतच सर्वसामान्यांनीही एक खगोलीय घटना म्हणून हे ग्रहण पाहिले. मात्र ग्रहणकाळात अनेक ठिकाणी काही कालबाह्य प्रथा परंपरा पाळल्याचेही दिसून आले. ग्रहण काळात असाच एक धक्कादायक प्रकार कर्नाटकमध्ये दिसून आला. कर्नाटकमधील कलबुर्गी जिल्ह्यामधील ताजसुल्तानपूर गावात आज तीन 'विशेष' मुलांना गळ्यापर्यंत जमिनीत पुरण्यात आले. ग्रहणकाळात अशा विशेष मुलांना जमिनीत पुरुन ठेवल्यास त्यांच्यामधील व्यंग दूर होते, या समजूतीमधून या मुलांच्या पालकांनी हे कृत्य केले.
अंधश्रद्धेचा कहर, व्यंग दूर व्हावे म्हणून ग्रहणकाळात 'विशेष' मुलांना जमिनीत पुरले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 4:42 PM