शोपियन येथे तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2020 02:01 PM2020-01-20T14:01:09+5:302020-01-20T14:03:37+5:30

दहशतवाद्यांनी स्वत: ला घेराव घातल्याचे समजताच दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार सुरू केला.

Three terrorists were killed at Shopian | शोपियन येथे तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान

शोपियन येथे तीन दहशतवाद्यांना घातले कंठस्नान

Next
ठळक मुद्देप्रत्युत्तर म्हणून सुरक्षा दलाने तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. १२ जानेवारीला त्रालमध्ये जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. हमादचा खात्मा हे सुरक्षा दलासाठी विशेष यश होते.

जम्मू-काश्मीर - दक्षिणी काश्मीरमधील शोपियनच्या वाची भागात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांच्यात झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले आहे. २०२० मधली ही तिसरी चकमक आहे. आज, सोमवारी पहाटे सुरक्षा दलाला वाची परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली. लवकरच सुरक्षा दलाने या भागाला घेराव घालण्यास सुरवात केली. यावेळी दहशतवाद्यांनी स्वत: ला घेराव घातल्याचे समजताच दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार सुरू केला.

सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना शरण जाण्यास सांगितले. पण सुरक्षा दलाच्या या आवाहनाकडे दुर्लक्ष करून दहशतवाद्यांनी सतत गोळीबार चालू ठेवला. प्रत्युत्तर म्हणून सुरक्षा दलाने तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. 

ठार झालेल्या दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. कलम ३७० हटवल्यापासून दहशतवादी संघटना खोऱ्यातील वातावरण खराब करण्याचा कट रचत आहेत. त्याचबरोबर लष्कराची तत्परता दहशतवादी संघटनांचा हेतू यशस्वी होऊ देत नाही. १२ जानेवारीला त्रालमध्ये जवानांनी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.
यापूर्वी १२ जानेवारी रोजी पुलवामा येथील त्राळ येथे झालेल्या चकमकीदरम्यान जवानांनी तीन दहशतवाद्यांना ठार मारले होते. ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर हमाद खानचा समावेश होता. हमादचा खात्मा हे सुरक्षा दलासाठी विशेष यश होते.

दहशतवादी सबझार अहमद भट्ट हा मारल्या गेल्यानंतर हिजबुल मुजाहिद्दीनने काश्मीरमध्ये दहशतवाद पसरवण्याची दहशतवादी हमाद खानची जबाबदारी देण्यात आली होती. त्याला नवीन कमांडरही बनवण्यात आले होते. हा दहशतवादी हमाद त्राळचा रहिवासी होता. दहशतवाद्यांनी खोऱ्यात दहशत पसरवण्यासाठी माजी हिजबुल कमांडर बुरहान वानी यांच्यासोबत काम केले होते. पीडीपीचे माजी आमदार एजाज मीर यांच्या जवाहर नगरमधील घरातून आठ शस्त्रे लुटल्याचा त्याच्यावर आरोप होता. २९ सप्टेंबर २०१८ मध्ये त्याने ही चोरी केली होती. वासीम वानी असे दुसऱ्या मृत दहशतवाद्याचे नाव आहे. तो शोपियनचाच राहणार होता. तिसऱ्या दहशतवाद्याची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे. सुरक्षा दलाला या मृत दहशतवाद्यांकडे शस्त्रास्त्रे सापडली आहेत.

'

Web Title: Three terrorists were killed at Shopian

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.