तिरुपती बालाजींच्या दर्शनासाठी भक्तांच्या लांबचलांब रांगा, एकाच दिवसांत जमले एवढे दान
By ऑनलाइन लोकमत | Published: June 10, 2020 07:19 PM2020-06-10T19:19:46+5:302020-06-10T19:23:59+5:30
तिरुपती : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आला होती. मात्र, आता सरकारने लॉकडाउनमधून काही प्रमाणात सूट ...
तिरुपती : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आला होती. मात्र, आता सरकारने लॉकडाउनमधून काही प्रमाणात सूट द्यायला सुरुवात केली आहे. याला सरकारने अनलॉक-1 असे नाव दिले आहे. यानंतर 8 जूनला तिरुमला तिरुपती देवस्थानने भक्तांच्या दर्शनासाठी मंदिराचे दरवाजे पुन्हा खुले केले. मंदिराचे दरवाजे खुले केल्यानंतर पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी देवस्थानला हुंडी संग्रहात तब्बल 25.7 लाख रुपये मिळाले आहेत.
तब्बल 83 दिवसांच्या लॉकडाउननतंर हे मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले आहे. विशेष म्हणजे सुरुवातीचे तीन दिवस केवळ येथील कर्मचारी आणि स्थानिक लोकांसाठीच होते. आता 11 जूनपासून सर्वांसाठी या मंदिराचे दरवाजे खुले करण्यात येणार आहेत.
दिलासादायक : जगातल्या 'या' पहिल्या शहरात 'हर्ड इम्यूनिटी'नं होतोय कोरोनाचा खात्मा! पण...
पहिल्याच दिवशी भाविकांच्या लांबच्या लांब रांगा -
यापूर्वी तिरुमाला तिरुपती देवस्थान खुले करण्यापूर्वी काउंटर्सवर तिकीट विक्रीच्या पहिल्याच दिवशी भाविकांच्या लांबच्या लांब रांगा दिसून आल्या होत्या. राज्याने सकाळी 8 वाजता राज्यातील सर्वच काउंटर्सवर तिकीट विक्री सुरू केली होती. 11 तारखेची तिकिटे अवघ्या काही वेळातच विकली गेली होते. यानंतर आंध्र प्रदेश सरकारने 12 तारखेची तिकिटे विकण्याचा निर्णयही घेतला होता. मंदिर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारपर्यंत तब्बल 9 हजार तिकीटे विकली गेली होती.
दिलासादायक! कोरोना होतोय हद्दपार; 'या' 26 देशांमध्ये आता एकही रुग्ण नाही
दर्शनापूर्वी करावे लागेल या नियमांचे पालन -
सांगण्यात येते, की सर्व भाविकांना मास्कचा वापर अनिवार्य असेल. तसेच रांगेत उभे राहण्यापूर्वी सॅनिटाइझ होणेही बंधनकारक असेल. देवस्थानने मंदिर परिसराचे स्पर्श-मुक्त परिसरात रुपांतर केले आहे. भाविक रांगेत आल्यानंतर, कोणत्याही गोष्टींसाठी त्यांना कुठेही स्पर्श करावा लागणार नाही. तसेच भक्तांना रांगेत 5 ते 6 फुटांचे अंतर ठेवावे लागेल.
भारतात नेमका कसा आणि कुठून आला कोरोना? संशोधकांनी केला मोठा खुलासा, सांगितलं बरंच काही
तिरुपती मंदिर हे जगातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक
कोरोना व्हायरस महामारीमुळे तिरुपती मंदिर 20 मार्चपासून बंद होते. तिरुपती मंदिर हे जगातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे. येथे दर महिन्याला जवळपास 200 कोटी रुपये मंदिराला मिळतात. मात्र, लॉकडाउननंतर हे बंद झाले होते.
कालापानी-लिपुलेख मुद्द्यावर नेपाळची माघार नाही, भारताविरोधात मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत