तिरुपती देवस्थानचे ४ हजार कोटींचे बजेट, कोरोना साथीनंतर देणग्यांमध्ये वाढ!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2023 11:08 AM2023-03-25T11:08:05+5:302023-03-25T11:08:32+5:30
तिरुमला तिरुपती देवस्थानचे कार्यकारी अधिकारी ए. व्ही. धर्मा रेड्डी यांनी हा अर्थसंकल्प मांडला.
तिरुपती : येथील तिरुमला तिरुपती देवस्थानाने २०२३-२४ या वर्षासाठीचा ४,४११.६८ कोटी रुपयांचा वार्षिक अर्थसंकल्प जाहीर केला आहे. या देवस्थानासाठी तेथील कोणत्याही विश्वस्त मंडळाने मंजूर केलेला हा सर्वात मोठा अर्थसंकल्प आहे.
तिरुमला तिरुपती देवस्थानचे कार्यकारी अधिकारी ए. व्ही. धर्मा रेड्डी यांनी हा अर्थसंकल्प मांडला. त्याबाबत या देवस्थानचे अध्यक्ष वाय. व्ही. सुब्बारेड्डी यांनी सांगितले की, तिरुपती देवस्थानाला भाविकांकडून मिळणाऱ्या देणग्यांमध्ये कोरोना साथ ओसरल्यानंतर पुन्हा लक्षणीय वाढ झाली आहे. व्हीआयपी दर्शनासाठी विशिष्ट वेळ राखून ठेवली आहे. ती कायम राहील. त्यामुळे भाविकांना देवदर्शनासाठी लागणारा प्रतीक्षा कालावधी घटला आहे. (वृत्तसंस्था)
श्रीनिवास सेतूचे बांधकाम एप्रिलमध्ये होणार पूर्ण
- श्रीनिवास सेतू एक्स्प्रेसवेचे येत्या एप्रिलमध्ये बांधकाम पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्याचे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येईल.
- अलिपिरी ते वाकुलामाता दरम्यान रस्ता बांधण्यासही देवस्थान मंडळाने मंजुरी दिली.