TMC नेत्या शयानी घोष यांना हत्येच्या आरोपात अटक, काय आहे प्रकरण ?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 08:42 AM2021-11-22T08:42:55+5:302021-11-22T08:43:48+5:30

शयानी घोष यांच्या अटकेमुळे संतप्त झालेल्या 12 टीएमसी खासदारांचे शिष्टमंडळ दिल्लीत पोहोचले आहे.

TMC Leader Saayoni Ghosh arrested in murder case by Tripura police | TMC नेत्या शयानी घोष यांना हत्येच्या आरोपात अटक, काय आहे प्रकरण ?

TMC नेत्या शयानी घोष यांना हत्येच्या आरोपात अटक, काय आहे प्रकरण ?

Next

नवी दिल्ली: भाजप कार्यकर्त्याच्या तक्रारीवरुन तृणमूल काँग्रेसच्या नेत्या शयानी घोष(TMC Leader Saayoni Ghosh) यांना त्रिपुरा पोलिसांनी अटक केली आहे. शयानीला आगरतळा येथे हत्येच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. शायनी टीएमसीच्या युवा मोर्चाचा प्रदेशाध्यक्ष आहेत. अतिरिक्त एसपी(शहर) पश्चिम त्रिपुरा, बीजे रेड्डी यांनी सांगितले की, प्राथमिक पुराव्यांच्या आधारे त्यांना अटक करण्यात आली आहे. भा.दं.वि. कलम 307, 153 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या सभेत व्यत्यय आणला
शनिवारी रात्री मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांच्या सभेत व्यत्यय आणल्याचा आरोप भाजपच्या एका कार्यकर्त्याने घोषवर केला आहे. घोष सभेच्या ठिकाणी पोहोचल्या आणि 'खेला होब' अशा घोषणा दिल्याचा आरोप आहे. शायनी घोष यांना तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी यांच्या भेटीच्या 24 तास आधीच अटक करण्यात आली आहे.

TMCचे 12 खासदार दिल्लीत
दरम्यान, शयानी घोष यांच्या अटकेमुळे संतप्त झालेल्या 12 टीएमसी खासदारांचे शिष्टमंडळ दिल्लीत पोहोचले आहे. त्रिपुरातील कथित पोलिस क्रूरतेबद्दल त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीची वेळ मागितली आहे. TMC सूत्रांचे म्हणणे आहे की पक्षाचे कार्यकर्ते आणि खासदार उद्या सकाळी दिल्लीत धरणे आंदोलन करणार आहेत.

टीएमसी नेत्यावर हल्ला

त्रिपुरात TMC नेते कुणाल घोष यांच्यावर हल्ला झाला तेव्हा ते पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी आले होते. यादरम्यान काही पत्रकारांवरही हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर अटक करण्यात आलेल्या टीएमसी नेत्या शयानी घोष यांना पोलिस ठाण्यात सुरक्षित स्थळी नेण्यात आले आहे. सत्ताधारी भाजप कार्यकर्त्याच्या तक्रारीनंतर त्रिपुरा पोलिसांनी तृणमूल काँग्रेसच्या नेत्या शयानी घोष यांना अटक केली. त्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ट्विट करुन त्रिपुराच्या भाजप सरकारवर राजकीय पक्षांच्या शांततापूर्ण निषेधाच्या अधिकारांबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्याचा आरोप केला.
 

Web Title: TMC Leader Saayoni Ghosh arrested in murder case by Tripura police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.