भाजपला सत्तेतून हटवेपर्यंत संपूर्ण देशात 'खेला होबे'; ममतांचा मोदी सरकारवर निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 04:56 PM2021-07-21T16:56:30+5:302021-07-21T17:00:48+5:30
ममता म्हणाल्या भाजपने देशाला अंधकारात नेले आहे. ते जोवर केंद्राच्या सत्तेतून बाहेर जात नाही, तोवर ‘खेला होबे’. पेगासस हेरगिरीच्या मुद्द्यावरूनही निशाणा साधला.
कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी आज शहीद दिवस साजरा करत आहेत. टीएमसी पक्षाच्या निर्मितीपासूनच दरवर्षी 21 जुलैला शहीद दिवस साजरा केला जातो. यानिमित्त ममता बॅनर्जी यांनी आज व्हर्च्युअलीच संबोधन केले. ममता म्हणाल्या भाजपने देशाला अंधकारात नेले आहे. ते जोवर केंद्राच्या सत्तेतून बाहेर जात नाही, तोवर ‘खेला होबे’.
मुख्यमंत्री ममता म्हणाल्या, बंगालच्या जनतेने 'मा, माटी आणि मानुष'ची निवड केली आहे. त्यांनी अर्थशक्तीला नाकारले आहे. भाजप हुकूमशाहीवर उतरला आहे. त्रिपुरात आमचा कार्यक्रम रोखला गेला, हीच लोकशाही आहे का? ते देशातील संस्था नष्ट करत आहेत. मोदी सरकारला प्लास्टर करण्याची आवश्यकता आहे. आता आपल्याला काम सुरू करायचे आहे.
हेरगिरीवर खर्च करतायत देशाचा पैसा -
ममता बॅनर्जी यांनी पेगासस हेरगिरीच्या मुद्द्यावरूनही मोदी सरकारवर निशाणा साधला. ते म्हणाले, सरकार पेगाससच्या माध्यमाने हेरगिरी करत आहे. हेरगिरीसाठी पैसे खर्च करत आहे. यांत मंत्री आणि न्यायाधिशांचे नंबर टाकले जात आहेत. मात्र, याचा आम्हाला काही फरक पडत नाही.
पेगाससच्या माध्यमातून हेरगिरी करून पाडण्यात आलं काँग्रेसचं सरकार?; नव्या माहितीनं एकच खळबळ
भाजपला सत्तेतून बाहेर करेपर्यंत 'खेला होबे' -
ममता म्हणाल्या, मतदानानंतर राज्यात कसल्याही प्रकारचा हिंसाचार झाला नाही. मतदानाच्या बरोबर आधी, ते आमच्यावर कशा प्रकारे दबाव टाकत होते, आम्हाला माहीत आहे. आता जोवर भाजपला सत्तेतून काढत नाही, तोवर 'खेला होबे'. त्या म्हणाल्या 16 ऑगस्टला खेला दिवस साजरा करणार.